Home » महाराष्ट्र माझा » १०२ पत्रकारांना कीटचं वाटप.

१०२ पत्रकारांना कीटचं वाटप.

१०२ पत्रकारांना कीटचं वाटप.

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन.

– पुणे येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने अभिनंदनीय उपक्रम

उद्योजक मगराज राठी यांच्या वतीने मदत ..

गराडे दि.१७ : कोरोना विषाणूने जगभर धुमाकूळ घातला आहे.सर्वञ लाँकडाऊन असलेने कामकाज ठप्प आहे.अनेक पञकारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा पञकार संघातील गरजू पञकारांना महेश नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ,उद्योजक मगराजशेठ राठी यांनी जीवनावश्यक वस्तूंचे १०२ किराणा कीट व संनिटायझर व मास्क उपलब्ध करून दिले.
सर्वच पत्रकार सुखवस्तू आहेत. त्यांना काही अडचणी नाहीत असा एक चुकीचा समज समाजात पसरलेला आहे. मात्र वास्तव वेगळेच आहे.कोरोना विषाणूच्या प्रकोपाने अनेकांना अडचणीत आणले आहे. पञकारही अडचणीत आले आहेत.म्हणून मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांनी गरजू पञकारांना मदत करण्याचे आवाहन मराठी पञकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे व पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे व पुणे जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांना केले होते.पञकार संघाच्या पदाधिका-यांनी गरजू पञकारांना मदत करण्याची विनंती मगराज राठी यांना केली.त्यांनी तात्काळ होकार देवून तात्काळ ही मदत दिली.
किराणा किट , मास्क,सँनिटायझर वितरण नियोजनप्रसंगी शरद पाबळे,बापूसाहेब गोरे,सुनील लोणकर ,सुनील वाळुंज, दत्तानाना भोंगळे ,सुनीलनाना जगताप ,दादाराव आढाव,बाबासाहेब तारे,अमोल बनकर,प्रमोद गव्हाणे,जयदिप जाधव,अजित घस्ते,संजय कटके उपस्थित होते.
उद्योजक मगराजशेठ राठी यांचे पुणे जिल्हा पञकार सघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी आभार मानले.

– गोकुळनगर ( पुणे ) येथे महेश नागरी पतसंस्थेच्या वतीने गरजू पञकारांना देण्यात येणाऱ्या किराणा किटचे वितरण करीत असताना मगराज राठी शेजारी शरद पाबळे ,बापूसाहेब गोरे,सुनील लोणकर ,सुनील वाळुंज,दत्तानाना भोंगळे व पञकार संघाचे पदाधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published.