Home » माझी वडवणी » वडवणी पोलिसांचा सामाजिक उपक्रम…

वडवणी पोलिसांचा सामाजिक उपक्रम…

वडवणी पोलिसांचा सामाजिक उपक्रम…

-/डोंगरचा राजा / आँनलाईन

– गोरगरीब कुटुंबाला किराणा किटचं वाटप.

वडवणी शहरांमध्ये विविध भागात राहणाऱ्या गरीब कुटुंबाला आधार देत पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस निरीक्षक महेशकुमार टाक व त्यांच्या टीम ने एक महिना पुरेल इतक्या किराणा किटचं नुकतेच वाटप करण्यात आले.

देशात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महाराष्ट्राचा सर्वात मोठा नंबर लागला हे आपल्या साठी दुःखा ची बाब असुन महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाच्या वतीने यावर उपाय व्हावेत म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
त्या अनुषंगानेच २२ मार्च चा जनता कर्फ्यु देशभरात अभुतपुर्व यशस्वी झाल्याचे चित्र आपण पाहिले.व लागलीच संचारबंदी लागू करण्यात आली.आज संचारबंदीचा 25 वा दिवस आहे.3 मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली असून या एक महीन्यात ज्या गोरगरीबांचे हातावर पोट होते त्या गोरगरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.संचारबदीच्या काळात याच पोलिस बांधवांना आपल्या डोळ्यासमोर या गोरगरीब कुटुंबाचे हाल पहावले नाही. म्हणून पोलीस निरीक्षक महेशकुमार टाक व त्यांच्या टिमने वडवणी शहरातील विविध भागात राहणाऱ्या गरीब कुटुंबाला आधार देत पोलिस स्टेशनच्या वतीने एक महिना पुरेल इतक्या किराणा किटचं वाटप केले.शहरात असणा-या विविध सामाजिक संघटना,व संस्थांच्या मदतीने काही दिवसांपूर्वी असे उपक्रम हाती घेतले.मात्र बीड जिल्ह्यातील वडवणी हे पहिले पोलिस स्टेशन आहे जेथून गोरगरीब कुटुंबाला आधार देत थेट किराणा किटचं वाटप केले.याबाबत पोलिस निरीक्षक महेशकुमार टाक यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी उगाच प्रसिध्दी नको म्हणून सांगत गोरगरीब कुटुंबाला घरपोच किराणा किटचं वाटप केले असल्याने वडवणी पोलिस स्टेशनच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले जात आहे.त्याही पलिकडे पोलिस खात्यातील नोंदीत बीड जिल्ह्यातील वडवणी हा तालुका अतिसंवेदनशील तालुका म्हणुन नोंद आहे.याच तालुक्याला शांत करण्यासाठी पोलिस निरीक्षक महेशकुमार टाक व त्यांच्या टिमने मोठं आव्हान पार केले आहे.जनतेला देखील पोलिसांचे अधिकार काय असतात ते या संचारबंदीच्या काळात दिसुन येत आहेत. येथील पोलिस बांधवांनी शहर व तालुक्यात संचारबंदी काळात चोख बंदोबस्त ठेवला आहे.हे करत असताना सामाजिक बांधिलकी जोपासत गोरगरीब कुटुंबाला आधार दिल्याने जिल्ह्यात वडवणीचं एक वेगळं नाव नोंद झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.