कुंभार समाजावर उपासमारीची वेळ
डोंगरचा राजा / आँनलाईन
बीड – जगावर ओढवलेल्या कोरोना या संकटामुळे जो समाज मातीची वस्तु बनवुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने या विषयाकडे लक्ष देऊन समाजाला आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.
उन्हाळा या ऋतुतच मातीच्या वस्तुला म्हणजेच विट, माठ अशा प्रकारच्या वस्तुला जास्त मागणी असते त्यामुळे कुंभार समाज ज्या गोष्टींवर अवलंबून असतो त्यावर लाँकडाऊनमुळे खुप भयान असं संकट निर्माण झाले. महाराष्ट्र सरकारला कुंभार समाजाला आर्थिक मदत करून त्यांना आधार द्यावा
अशी मागणी शिवतेज युवा जनकल्याण सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुरज गोविंदराव तेलंगे यांनी केली.आहे