Home » ब्रेकिंग न्यूज » जिल्हाधिकाऱ्यांच्या सक्त सूचना..

जिल्हाधिकाऱ्यांच्या सक्त सूचना..

जिल्हाधिकाऱ्यांच्या सक्त सूचना..

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन

– सावधान !! सर्व व्हाॅट्सॲप ग्रुप ॲडमिनसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सक्त सूचना..

▪‌ आता ग्रुपमध्ये फक्त ॲडमिन मॅसेज करणार; ग्रुप मेंबरला मॅसेज करण्यास बंदी

बीड – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील निजामुद्दीन मरकास मस्जिद प्रकरणावरून व्हाॅट्सॲप ग्रुपमधून धार्मिक तेढ वाढविणारे संदेश प्रसारित होत आहेत. याला आवर घालण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व व्हाॅट्सॲप ग्रुप ॲडमिनसाठी कडक सूचना जारी केल्या असून वादग्रस्त पोस्टसाठी आता थेट ॲडमिनला जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच, ग्रुप मेंबरला आता ग्रुपमध्ये मॅसेज पाठविता येणार नाहीत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

सध्या दिल्ली प्रकरणामुळे अनेक व्हाॅट्सॲप ग्रुप मधून सांप्रदायिक भडकावू संदेश प्रसारित होत आहेत. परिणामी धार्मिक तेढ निर्माण होऊन सांप्रदायिक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अश्या संदेशांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व सर्व व्हाॅट्सॲप ग्रुप ॲडमिनसाठी नियम लागू केले आहेत. यापुढे बीड जिल्ह्यातील सर्व व्हाॅट्सॲपवर फक्त त्या ग्रुपचे ॲडमिन हेच मॅसेज टाकतील. ग्रुपमधील इतर कोणत्याही सदस्याला ग्रुपमध्ये मॅसेज करण्याचा अधिकार नसेल. तशी सेटिंग ग्रुपचे ॲडमिनने करून घ्यावयाची आहे. याउपरही कोणी या सूचनांचे पालन केले नाही आणि एखाद्या ग्रुपवर कोणीही धर्म, धर्मगुरु, धार्मिक स्थळाबाबत संदेश किंवा ज्यामुळे समाजामध्ये किंवा धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ शकेल असे संदेश प्रसारित केल्याचे आढळून आल्यास त्या ग्रुपच्या ॲडमिनला त्यासाठी जबाबदार धरण्यात येणार असून ॲडमिन गुन्ह्यास पात्र ठरतील अशा सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. मात्र, पूर्णपणे प्रशासकीय कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्रुपसाठी या सूचना लागू नसतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, संभाव्य कारवाई टाळण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व व्हाॅट्सॲप ग्रुप ॲडमिननी तातडीने आपापल्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये बदल करावा. अन्यथा तुमच्या ग्रुपमधील एखादी चुकीची पोस्ट तुम्हाला तुरुंगात पोहोचवू शकते.

– डोंगरचा राजा न्यूज
मोबाईल नंबर-9822548696

Leave a Reply

Your email address will not be published.