मशीन कर्मचाऱ्यांना अन्नधान्य वाटप.
-/ डोंगरचा राजा / आँनलाईन
– जिल्हा मराठी पत्रकार संघ व कुटेग्रुपचा सामाजिक उपक्रम
वृत्तपत्र मशीन विभागातील कर्मचाऱ्यांना अन्न धान्याची मदत
बीड / प्रतिनिधी
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात लोकडाऊन जाहीर झाले काही काळ वृत्तपत्र डिझिटल देण्यात आली प्रिंटिंग बंद असल्याने मशीन विभागात काम करणाऱ्या कामगाराची अवस्था बिकट असल्याची जाणीव झाल्याने अ भा मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न बीड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि कुटे ग्रुप च्या वतीने या कामगारांना आज गुरुवार दि २ एप्रिल २०२० रोजी मान्यवरांच्या हस्ते गहू ,तांदूळ आणि तिरुमला खाद्य तेलाचे वितरण करण्यात आले .
बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जमावबंदी आणि संचार बंदी लागू केली या दरम्याने सर्वच वृत्तपत्रांनी आपली प्रिंटिंग थांबवली व डिझिटल आवृत्ती सुरु ठेवली या दरम्यान छपाई मशीन विभागात काम करणारे आपरेटर हेल्पर व इतर कामगारावर घरी बसण्याची वेळ आली अनेकांचे हातावरचे पोट आणि जेमतेम परस्थिती असल्याने मराठी पत्रकार परिषदेचे विश्व्स्त एस एम देशमुख याना हि अडचण सांगितल्यानंतर त्यांनी काही करता येत असेल तर करा असे संगीतले त्यानंतर कुटे ग्रुप आणि बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्वच वृत्तपत्रातील मशीन विभागातील कर्मचाऱ्यांना ८ किलो गहू ,३ किलो तांदूळ आणि एक किलो तिरुमला खाद्य तेल देण्याचा निर्धार केला त्यानुसार आज गुरुवारी दैनिक चंपावतीपात्र कार्यालयात गर्दी न करता मान्यवर कुटे ग्रुपचे प्रमुख अधिकारी राजकुमार आपेट, रवी कालभे,जेष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर ,राजेंद्र आगवान,दिलीप खिस्ती यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूची किट देण्यात आली यावेळी बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष चौरे , संतोष क्षीरसागर ,अविनाश वाघीरकर आत्मराम वाव्हळ ,शिवप्रसाद सिरसाट सुनील क्षीरसागर माधव साळुंके अशोक झणझण सुजित पोपळे यांनी सहकार्य केले बीड शहरातील मशीन विभागातील जवळपास ८० टक्के गरजू कर्मचार्यांना धान्य वाटप केले त्या नंतर त्यांनी समाधान झाल्याच्या भावना व्यक्त केल्या