Home » महाराष्ट्र माझा » डॉ.आंबेडकर जयंतीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले

डॉ.आंबेडकर जयंतीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले

डॉ.आंबेडकर जयंतीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन.

– लॉकडाऊनच्या काळात डॉ.आंबेडकर जयंतीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा आपण जवळपास महिना ते दीड महिना साजरा करत असतो. मात्र आता यावेळेला हा सोहळा साजरा करण्याचा प्रसंग आहे का? याचा गांभिर्याने विचार करायची गरज आहे, असं पवार यांनी म्हटलं आहे.

आपण अनेकदा आंबेडकर जयंतीसारखा सोहळा हा तीन ते चार आठवडे साजरा करत असतो. यावेळेला थोडंस या कार्यक्रमाला पुढे नेणं शक्य आहे का? याचा विचार निश्चितपणे करायची वेळ आली असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

आपण सामूहिकपणे एकत्र आलो तर त्यामुळे नवीन समस्यांना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवू शकतो. याचा परिणाम समाजाच्या सर्व घटकांवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाबासाहेबांचे स्मरण करुया. त्यांचे योगदानाचे आठवण करु, असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.