Home » माझा बीड जिल्हा » बँक खात्यांमध्ये जमा करणार -जिल्हाधिकारी

बँक खात्यांमध्ये जमा करणार -जिल्हाधिकारी

बँक खात्यांमध्ये जमा करणार -जिल्हाधिकारी

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन

– शासनाच्यावतीने विविध अनुदान शेतकरी नागरिकांच्या बँक खात्यांमध्ये जमा करणार-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

– रक्कम काढण्यासाठी संदेश प्राप्त झाल्यानंतर उद्यापासूनच्या तारखा करण्यात आल्या घोषित.

– खातेदारास एसएमएस’द्वारे पैसे संबंधित खात्यात जमा झाल्याची दिली जाणार माहिती

बीड – शासनाच्या वतीने शेतकरी नागरिकांच्या खात्यांमध्ये विविध अनुदान जमा करण्यात येत असून एस एम एस संदेशाद्वारे खातेदारास याची माहिती कळविले जाईल. स्टेट बँकेच्या वतीने ही रक्कम काढण्यासाठी प्रत्येक खातेदारास साधारणता वेगवेगळी तारीख निश्चित करण्यात आले आहे असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक नंदकिशोर भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे .
आज दिनांक 2 एप्रिल पासून 10 एप्रिल 2020 पर्यंत हे अनुदान नागरिकांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार असून *शेतकरी नागरिकांनी ही अनुदान रक्कम त्यांना त्यांच्या मोबाईल फोन वर रक्कम जमा झाल्याचा एस एम एस संदेश प्राप्त झाल्यानंतर* निश्चित केलेल्या दिनांकास दिनांक 3 एप्रिल पासून 11 एप्रिल 2020 पर्यंत पुढील प्रकारे काढता येईल.
बँक खातेदाराचा खाते क्रमांकाचा शेवटचा नंबर 0 व 1 असल्यास बँकेत अनुदान 2 एप्रिल रोजी जमा होईल व खात्यातून पैसे काढण्याची ची तारीख 3 व 4 एप्रिल 2020 राहील.
तसेच खाते क्रमांकाचा शेवटचा नंबर 2 व 3 असल्यास अनुदान 4 एप्रिल रोजी जमा होईल व पैसे 5 व 6 एप्रिल रोजी काढता येतील.
खाते क्रमांकाचा शेवटचा नंबर 4 व 5 असल्यास अनुदान 6 एप्रिल रोजी जमा होईल व पैसे 7 व 8 एप्रिल रोजी काढता येतील.
तसेच खाते क्रमांकाचा शेवटचा नंबर 6 व 7 असल्यास अनुदान 8 एप्रिल रोजी जमा होईल व पैसे 9 व 10 एप्रिल रोजी काढता येतील.
खाते क्रमांकाचा शेवटचा नंबर 8 व 9 असल्यास अनुदान 10 एप्रिल रोजी जमा होईल व पैसे 11 एप्रिल व पुढे काढता येतील.
जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशांच्या पार्श्वभूमीवर रक्कम काढण्यासाठी बँकेत गर्दी होऊ नये यासाठी ही उपाययोजना अमलात आणली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.