घरातुन बाहेर पडु नका – सरपंच विकास मुंडे
-/ डोंगरचा राजा / आँनलाईन
– चिखलबीडमध्ये सोडियम हायप्रोक्लोराईट द्रावण फवारणी.
चिखलबीड/प्रतिनिधी
चिखलबीड येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सोडियम हायप्रोक्लोराईट द्रावणची केली फवारणी करुन गावक-यांना घरातुन बाहेर पडु नका अशा सूचना देत सरपंच विकास मुंडे यांनी हा सामाजिक उपक्रम राबविल्याने त्यांच्या कार्याची वाहवा होत आहे.
वडवणी तालुक्यात असणाऱ्या चिखलबीड ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विकास मुंडे यांच्या संकल्पनेतून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक 30/03/20 रोजी संपुर्ण गावांमध्ये सोडीयम हायप्रोक्लॉराइट द्रावणची हायजेट पंपाच्या साह्याने फवारणी करण्यात आली. संपूर्ण जगामधील विविध देशात कोरोना व्हायरस निर्माण झाल्याने अनेक जणांचा बळी गेला. आपल्या भारत देशातही या महाभयानक व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला असून तो रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार योग्य त्या उपाययोजना राबवत आहे.दुसरीकडे बीड जिल्ह्याचे जिल्हा प्रशासन हे देखील जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व ताकद पणाला लावत आहे. प्रशासनाने राबविलेल्या विविध यंत्रणा यांना देखील समाजातील प्रत्येक घटकाने साथ दिली पाहिजे आणि या विषाणूंचा नायनाट केला पाहिजे त्यासाठी आपण आपल्या घरातून बाहेर पडू नका कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण एकच ध्यास घ्यावा तो म्हणजे घरातुन बाहेर न पडणे तरच आपण या महाभयानक विषाणूचा प्रादुर्भाव रोखु शकतो. तेव्हा गावातील सर्व जनतेला माझं आवाहन आहे.आता काही निवडणुका नाहीत,की कसलेही राजकारण नाही फक्त आणि फक्त एकच ध्यास घ्यावा आपण सर्व एक आहोत.आपल्या जिवावर बेतणारी ही वेळ आली आहे.त्यावर मात करण्यासाठी तुम्ही आम्ही सतर्क राहून याच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फक्त घरात राहुन मोडीत काढू , सहकार्य करा घरातुन बाहेर पडु नका असे आवाहन देखील सरपंच विकास मुंडे यांनी गावक-यांना केले आहे.