Home » माझी वडवणी » गावासाठी वाट्टेल ते.. हिच दिनेश मस्केंची भुमिका..

गावासाठी वाट्टेल ते.. हिच दिनेश मस्केंची भुमिका..

गावासाठी वाट्टेल ते.. हिच दिनेश मस्केंची भुमिका..

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन

गावाच्या मदतीला सतत धावून येणारं नेतृत्व व ज्या ज्या वेळी गांव संकटात सापडले अगदी त्या त्या वेळी मनापासून गावासाठी वाट्टेल ते.. ही भूमिका जोपासना करणारे आ.प्रकाश सोळंके यांचे कट्टर समर्थक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिनेश मस्के यांनी भारत देशावर संकट निर्माण झाले त्यात आपलं गाव ही आहे आपल्या गावातील जनतेच्या जिवालाही धक्का लागू नये म्हणून त्यांनी जनतेसाठी गावातच विविध उपक्रम राबविले आहेत.

वडवणी तालुक्यातील बाहेगव्हाण हे गाव जरी छोटं असलं तरी मनाने फार मोठं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.ज्या ज्या वेळी गावावर संकट येईल त्या त्या वेळी गावातील अनेक मातबर पुढारी एकत्र येऊन गावच्या विकासासाठी धडपडत असताना दिसून येतात. त्यातून उल्लेख करायचाच म्हटला तर आ.प्रकाश सोळंके यांचे कट्टर समर्थक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते दिनेश मस्के यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. वडवणी तालुक्यातील सर्वात पाणीटंचाई निर्माण होणारं गाव म्हणून बाहेगव्हाणकडे पाहिले जात होते. मात्र उर्ध्व कुंडलिका प्रकल्प झाला आणि त्या प्रकल्पातून गावासाठी पाणी पुरवठा योजना राबविले पाहिजे ही भूमिका अंगी बाळगून राजकारण न करता सर्वांना एकत्र करत गावासाठी चोवीस तास पाणी उपलब्ध व्हावे यासाठी दिनेश मस्के यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली.जेव्हा जेव्हा गावाला व गावच्या शाळेला काही अडचण असेल तेव्हा दिनेश मस्के हे नेहमी गावासाठी धावून येतात , सध्याच्या कोरोना महामारी पासून गावकऱ्यांचे रक्षण व्हावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या गावात दिनेश मस्के यांच्या कडून गावकऱ्यांसाठी पाण्याची टाकी, हॅन्ड वॉश, बेसिन , साबण व मास्क इत्यादी साहित्य त्यांनी ग्रामपंचायत कार्यालला स्वखर्चाने दिले आहे.गावचे सरपंच ,उपसरपंच यांनी सदर साहित्यांचे सगळ्या गावात ठीक ठिकाणी नियोजनबध्द बसवत आहेत. ग्रामस्थांनी देखील मनामध्ये कोणताही संकोच न बाळगता या उपलब्ध करून देण्यात आलेल्या साहित्यांचा लाभ वेळोवेळी घेऊन आपल्या गावात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सर्व समाज बांधवांनी सतर्क राहावे असे आवाहन देखील आ.प्रकाश सोळंके यांचे कट्टर समर्थक दिनेश मस्के यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.