‘त्या’ तीनही संशयितांचे अहवाल निगेटिव्ह!
-/ डोंगरचा राजा / आँनलाईन
– बीड जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण नाही..
बीड : कोरोना विषाणूमुळे तयार झालेल्या भीतीदायक वातावरणात बीड जिल्ह्यातील जनतेला दिलासा देणारी बातमी आली आहे. अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील एका रुग्णाचे आणि बीडच्या जिल्हा रुग्णालयातील दोन रुग्णांचे स्वॅब प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या तिन्ही रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातून आतापर्यंत पाठविण्यात आलेले सर्वच १४ अहवाल निगेटिव्ह आल्याने बीडकरांसाठी हा मोठा दिलासा आहे. सुदैवाने अद्याप जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही.
बीड व अंबाजोगाई येथे कोरोना संशयितांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेले आहेत. रविवारी बीडमध्ये दोन व अंबाजोगाईत एक असे तीन संशयित रुग्ण दाखल झाले होते. त्यांचे स्वॅब तपासणीला घेऊन प्रयोगशाळेत पाठविले होते. सोमवारी दुपारी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत १४ संशयित रुग्ण आयसोलेशनमध्ये दाखल झाले होते. कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे.