Home » देश-विदेश » केंद्राने जाहीर केली नियमावली!

केंद्राने जाहीर केली नियमावली!

केंद्राने जाहीर केली नियमावली!

-/डोंगरचा राजा / आँनलाईन

– फटके खाऊनही बाहेर फिरणाऱ्या नागरिकांसाठी केंद्राने जाहीर केली नियमावली!

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन जाहीर केला. मात्र जनता दररोज लॉकडाऊन पायदळी तुडवताना दिसत आहे. संपूर्ण देशाने लॉकडाऊनचे पालन करावे यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने नियमावली प्रसिध्द केली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाने या नियमांचे कठोर पालन करण्याचे आदेश सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.

कायद्याने दिलेल्या अधिकाऱ्याचा वापर करत नियमावली व आदेश जारी करण्यात आले आहेत. हे नियम तोडणाऱ्यांना कलम १८८ प्रमाणे अधिपासूनच शिक्षा आहे. सरकारने दिलेल्या वैधानिक आदेशाचे उल्लंघन करणे, हा गुन्हा आहे व त्यासाठी सहा महिन्यापर्यंतची कैदेची तरतूद आहे. परंतू प्राप्त परिस्थितीत याहून कडक शिक्षेची गरज लक्षात घेऊन सरकारने त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या ५१ ते ६० या कलमांचाही वापर करण्याचा आदेश दिला आहे.

त्यामुळे नागरिकांनी जर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यास त्यांना मोठी शिक्षा भोगावी लागणार आहे. अनेक गुन्हे त्यांच्यांवर लागू शकतात. त्यामुळे जर या शिक्षेपासून आणि करोनापासून आपला बचाव करायचा असेल तर मोदींनी जाहीर केलेला लॉकडाऊन पाळा.. घरात बसा.

Leave a Reply

Your email address will not be published.