Home » माझी वडवणी » अमोल आंधळे मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम

अमोल आंधळे मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम

अमोल आंधळे मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन

– गरजूंना किराणा,पाणी,अन्नधान्य,
हँडवॉश व डेटॉल साबणचे वाटप.

– २१ दिवस घरातच थांबुन हात धुवून स्वच्छ घरातच राहण्याचे अमोल आंधळे यांनी केले अवाहन.

– २१ निराधार कुटूंबीयांना २१ दिवस पुरेल एवढे किराणा सामानाचेही केले वाटप.

वडवणी – कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन आपापल्या स्तरावर उपाय योजना राबवतच आहे.मात्र शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचण्याच्या अगोदर वडवणी शहरातील अमोल आंधळे मित्र मंडळ व लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाण गरजूंच्या मदतीला धावून आले आहे.शहरातील जवळपास बाराशे लाभार्थ्यांना,अन्नधान्य,पाणी,
हँडवॉश व डेटॉल साबण वाटप करण्यात आले.तसेच २१ निराधार कुटूंबीयांना २१ दिवस पुरेल एवढे किराणा सामानाचेही वाटप करण्यात आले आणी २१ दिवस घरातच थांबून वारंवार हात धुवून स्वच्छ राहण्याचे आवाहन अमोल आंधळे यांनी नागरिकांना केले आहे. यावेळी नाभिक महामंडळाचे युवराज शिंदे,
वैभव सोळुंके,बबलू कदम,बिभीषण लोंढे,लखन वाघमोडे,राम पतंगे, शेख तौफीक,त्रषीराज कानगावकर,शंकर धावडे यांच्यासह अमोल आंधळे मित्र मंडळाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.संपूर्ण बीड जिल्हा लॉकडाऊन आहे.या लॉकडाऊन च्या काळात 11 ते दुपारी ३ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सवलत दिलेली आहे.याच काळात काल दिनांक 27 मार्च व आज दिनांक 28 मार्च हे सलग दोन दिवस अमोल आंधळे मित्रमंडळाने वडवणी शहरातील वार्ड क्रमांक २,३,४,५,६ मधील सहाशे कुटुंबांना म्हणजे जवळपास बाराशे लाभार्थ्यांना गहू,तांदूळ,हँडवॉश,डेटॉल साबण तसेच स्वतःच्या टँकरने पाणीपुरवठा करून लोकांच्या जिवनावश्यक असलेल्या अडचणी सोडवल्या आहेत.मित्र मंडळाच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.संचारबंदीच्या काळात घरपोच अन्नधान्य,हँडवॉश,डेटॉल साबण इत्यादी साहित्य घरपोच मिळाल्यामुळे नागरिकांना किमान पंधरा दिवस तरी दिलासा मिळाला आहे.गरजूंना व २१ निराधार कुटूंबियांना किराणा सामान तसेच बाराशे गरजुंना अन्नधान्य,हॅन्डवॉश,
डेटॉल साबण,पाणी तसेच मास्कचे व इतर साहित्याचे वाटप केल्यामुळे अमोल आंधळे मित्रमंडळाचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.
आणखी १९ दिवस घरात थांबून दिवसातुन जास्तीत वेळा हात धुवून स्वच्छ राहावे तसेच संचारबंदी शिथील केलेल्या काळात आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.व स्वतःसह संपुर्ण कुटुंबाची काळजी घ्यावी व कोणतीही गरज भासल्यास संपर्क करावा असे अवाहन येथील युवक कार्यकर्ते अमोल आंधळे यांनी वार्ड क्रमांक २,३,४,५,६ मधील नागरिकांना केले आहे.

– २१ निराधार कुटुंबीयांना २१ दिवसाचे किराणा सामानाचे वाटप.

वडवणी शहरातील वार्ड क्रमांक ३,४,५ व ६ मधील जवळपास २१ निराधार कुटूंबीयांना २१ दिवस पूरेल एवढे किराणा सामानाचे वाटप निराधार कुटूंबीयांच्या घरी जाऊन केले आहे.यामुळे हातावर पोट असणा-या व ज्यांच्या मागे पुढे कोणीच नाही अशांच्या चेह-यावर हस्य फूलले आहे.ज्यांच्या घरावरुन कर्त्या माणसाचा हात निघाला अशा २१ कुटूबीयांचा अधार म्हणुन शहरातील लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाण व अमोल आंधळे मित्र मंडळाने मदतीचा हात पुढे केला आहे.गरिब व निराधार कुटूबीयांना अन्न-धन्न्य,किराणा सामान,पाणी,
हॅन्डवॉश,डेटॉल साबण व मास्कचे वाटप केल्यामुळे लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाण व अमोल आंधळे मित्र मंडळाचे सर्वच स्तरातुन अभिनंदन होत आहे.

1)मसनजोगी समाजातील सध्या हाताला काम नसणाऱ्या 60 कुटूंबाना प्रत्येकी 10 कि. गहू व 5 कि. तांदूळ 2)शिकलकारी समाज व सभोवतील 70 कुटुंब प्रत्येकी 10 कि. गहू व 5 कि. तांदूळ
3)प्रभाग क्र. 4 परिसरात कुटूंबाना 500 हँडवॉश व अँटिसेप्टिक साबणाच्या किट्स वाटप
4) वडवणी नाविनवस्ती परिसरात 21 निराधार कुटूंबाना किराणा वाटप
5) लोकांच्या सूचनेनुसार /मागणीनुसार आवशक ठिकाणी टँकर द्वारे पाणी पुरवठा

Leave a Reply

Your email address will not be published.