Home » माझा बीड जिल्हा » प्रशासनाचे आदेश पाळा – अँड.अजित देशमुख.

प्रशासनाचे आदेश पाळा – अँड.अजित देशमुख.

प्रशासनाचे आदेश पाळा – अँड.अजित देशमुख.

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन

– कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे आदेश पाळणे आवश्यक

बीड – कोरोनाने देशात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या बंदीच्या काळात कसलाही अतिरेक न करता जनतेने जिल्हा प्रशासनाचे आदेश पाळणे आवश्यक आहे. कोरोणा हा साथरोग असून एकमेकां पासून अंतर राहिले, तरच मात करता येते. मात्र संचारबंदी असतानाही रस्त्याने फिरायला निघालेले नागरिक हा रोग पसरण्याची शक्यता निर्माण झालेली असून जनतेने जिल्हा प्रशासना बरोबर रहावे आणि सर्व आदेशांचे पालन करावे, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार या सर्वांनी अत्यंत चांगली भूमिका घेत साथरोग निवारण्यासाठी कायदेशीर पावले उचलली आहेत. प्रशासन कामाला लागले असताना बऱ्याच ठिकाणी नागरिक नियम पायदळी तुडवत संचारबंदीच्या काळातही फिरताना दिसत आहेत. ही बाब योग्य नाही. शहरात नागरिक फिरत नसतील मात्र शहराच्या भोवतालच्या ज्या वस्त्या आहेत तिथे मात्र फिरण्यावर कुठलेही निर्बंध दिसत नसून सकाळ-संध्याकाळ नव्हे तर दिवसभर लोक घराबाहेर दिसत आहेत. पोलिसांनी यांचेवर बंधन आणणे आवश्यक आहे. गावाच्या बाहेरच्या बाजूने पोलिसांचे राउंड वाढले पाहिजेत आणि या फिरणारा मुळे रोगाचा प्रसार होऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे.

एकीकडे जिल्हा प्रशासन पूर्णपणे नियोजनामध्ये आणि कोरोना निवारण्यासाठी दक्ष आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात हे संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णालयांवर लक्ष ठेवून असून ते दवाखान्यात त्यांच्या सहकार्‍यांसह तळ ठोकून आहेत. अजून पर्यंत जिल्ह्यात कोरोणाची लागण झालेली नसली तरी देखील दक्षता बाळगणे आवश्यक आहे. ही दक्षता बाळगली गेली नाही तर भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळेच जिल्हा प्रशासन संचारबंदी सारखे अत्यंत दक्षतेचे आणि गंभीर निर्णय घेत आहे. जनतेने याचा विचार करावा आणि नियमांचे पालन करून, अशा काळामध्ये प्रशासना बरोबर राहण्याचे शिकावे, असे आवाहन देखील अँड. देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.