Home » ब्रेकिंग न्यूज » कोरोनाशी लढा 100 रूग्णांनी केले रक्तदान.

कोरोनाशी लढा 100 रूग्णांनी केले रक्तदान.

कोरोनाशी लढा 100 रूग्णांनी केले रक्तदान.

-/ रविकांत उघडे / माजलगाव

– माजलगावात रक्तदान शिबिर ,
100 रूग्णांनी केले रक्तदान ;5 एप्रिल ला पुन्हा रक्तदान.

माजलगाव – जागतिक संसर्गजन्य रोग म्हणुन घोषित केलेल्या कोरोना व्हायरसचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी गुरुवारी माजलगाव शहरात तालुका माहेश्वरी सभा व पत्रकार संघ ,व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 200 जणांनी रक्तदान करण्यासाठी नोंदणी केली होती मात्र 100 जणांचे रक्तदान झाले तर 100 रक्तदात्याना तांत्रिक अडचणी मुळे परत जावे लागले. या शिबीराचे आयोजन ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले होते.
कोरोनाचा जागतिक कहर झाल्यानंतर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. या लढ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न शासन स्तरावर होत आहेत, त्यास जनतेची साथ मिळत आहे. या लढ्यासाठी बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार
यांनी रक्तदान शिबिर घेण्याच्या केलेल्या आवाहनाला येथे प्रतिसाद देत माहेश्वरी सभेचे तालुका सचिव उमेशकुमार जेथलिया यांनी तालुका पत्रकार संघ व माहेश्वरी तालुका सभा,व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विध्यमाने रक्तदान आयोजित केले. या रक्तदान शिबिराची सुरूवात उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांनी रक्तदान करून करण्यात आली.
येथील ग्रामीण रुग्णालयात आमदार प्रकाश सोळंके, सभापती अशोक डक,वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे,
,ऍड. बंडू डक,गणेश लोहिया, नंदू आनंदगावकर,प्रा.कमलकिशोर लड्डा, उमेश मोगरेकर , विरेंद्र सोळंके ,बालाप्रसाद भुतडा , विनोद जाजु , सुदर्शन स्वामी , विजय मस्के ,भास्कर गिरी,महेश होके संयोजक उमेशकुमार जेथलिया यांचे उपस्थितीत सकाळी ११ वाजता रक्तदान शिबीर सुरू झाले. बीड जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे पथक व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल परदेशी,डॉ गजानन रुद्रवार यांच्या निगराणी खाली सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी , पत्रकार व सर्व थरातील नागरिक उस्फुर्तपणे सहभागी होत आहेत, त्यामुळे नोंदणी 200जणांनी केली होती परंतु वेळे अभावी अनेकांना परत जावे लागले तर आज 100 जणांनी रक्तदान या शिबिरात केले.पुढील आठवड्यात 5 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संयोजक उमेश जेथलिया यांनी सांगितले.उमेशकुमार जेथलिया यांच्या मार्गदर्शनाखाली संजय इंदानी,आकाश बियाणी,रविकांत उघडे सह माहेश्वरी सभा,पत्रकार संघ,व्यापारी महासंघाच्या पदाधिकारी नी शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published.