३१ मार्चपर्यंत मनाई आदेश लागू- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
– डोंगरचा राजा / आँनलाईन
– कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत मनाई आदेश लागू-जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड – कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात 31 मार्च 2020 पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार मनाई आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी निर्देश राहूल रेखावार यांनी दिले आहेत.
आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून 31 मार्च पर्यंत संपूर्ण बीड जिल्ह्यात सदर आदेश लागू करण्यात आले असून या आदेशाचे भंग झाले आहेत आहेत असे दिसून आल्यास संबंधित व्यक्ती, संस्था अथवा जमावा विरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम ५१ तसेच भादंवि १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षा व कारवाईस पात्र राहील.
जीवनावश्यक कारणासाठी 15 प्रकारच्या सेवा देणाऱ्या आस्थापना या कालावधीत दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत सुरू राहतील या काळात संचार बंदी शिथिल ठेवण्यात येईल.
या आदेशातून अंत्यविधी सारख्या घटनेत संबंधित क्षेत्राचे सक्षम कार्यकारी दंडाधिकारी यांच्या परवानगीने दहा व्यक्तीस आणि अत्यावश्यक सेवा वगळण्यात आले आहे.
००००००