Home » माझा बीड जिल्हा » दुकाने,बिअरबार ३१ मार्च पर्यंत बंद

दुकाने,बिअरबार ३१ मार्च पर्यंत बंद

दुकाने,बिअरबार ३१ मार्च पर्यंत बंद.

डोंगरचा राजा / आँनलाईन

– उघडली तर तक्रारी करा – अँड.अजित देशमुख

बीड – बीड जिल्ह्यातील नव्हे तर आसपासच्या सर्व जिल्ह्यातील दारूची दुकाने आता ३१ मार्च पर्यंत बंद रहाणार आहेत. त्यामुळे ज्या कुटुंबातील व्यक्ती दारू पितो, तो आता वेळेवर घरी पोहोचेल आणि परिवारा सोबत राहिल. या दारुड्याची सवय मोडण्यासाठी ही चांगली संधी असून त्याच्या कुटुंबातील महिलांनी आता या दारुड्यांना पुन्हा दारूच्या दुकानाकडे जाऊ न देण्यासाठी प्रयत्न करावेत आणि घराची बरबादी रोखावी. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाचे कठोर पालन न करणाऱ्या दारू दुकानाच्या तक्रारी जनतेने ताबडतोब त्या त्या पोलिस स्टेशनमध्ये कराव्यात, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यात बिअर बार, देशी दारू, वाईन शॉप आणि हातभट्टीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. दारू दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. ही गर्दी कोरोणामुळे रोखणे आवश्यक होतं. यासाठी जन आंदोलनाने सातत्याने पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकारी आवश्यक असलेले सर्व निर्णय तात्काळ घेत आहेत. जनतेने आता या निर्णयाचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे जेथे कुठे दारू विकतांना दिसतील, अशा सर्वांना पकडून त्या- त्या गावातील लोकांनी पोलिसांच्या अथवा प्रशासनाच्या ताब्यात देणे आवश्यक आहे.

एकतीस मार्चपर्यंत बीड जिल्ह्यातील दारू विक्री बंद असल्याने ज्यांच्या घरातील घरातील लोक दारू पितात त्या घरातील महिलांना आपापल्या कुटुंबातील दारू पिणाऱ्या सदस्याला व्यवस्थित हाताळणे सोपे होईल. दारू न मिळाल्याने त्याची सवय बंद होण्यास मदत होईल. मात्र ३१ मार्च च्या पुढे घरातील महिला सदस्यांची जबाबदारी वाढणार आहे. या महिलांनी दिवस मावळताच आपला नवरा, भाऊ अथवा वडील घरी वेळेवर येतो किंवा नाही याची कसून तपासणी केली पाहिजे. माऊल्यांनी पाठपुरावा केला तर या दारुड्याची दारू सुटण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यात नवीन दारू दुकाने होऊ नयेत म्हणून जन आंदोलन गेल्या दहा वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या काळात नवीन दारू दुकाने होणार नाहीत. नवीन बिअर शॉपी होणार नाहीत. आणि बाहेरची दुकाने जिल्ह्यात स्थलांतरित होणार नाहीत, असे वाटते. जिल्हाधिकारी यांनी अशा प्रकारचे निर्णय घेऊन दारुड्यांची संख्या वाढवणे योग्य होणार नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांना जनआंदोलन याबाबतचे निवेदन देणार आहे.

सध्यातरी जे कोणी चुकीच्या पद्धतीने आणि बंदच्या काळात अधिकृतरित्या लायसन असणारे दारू विकत आहेत अथवा हातभट्टी वाले बेकायदेशीर रीतीने विकत आहेत, अशा लोकांवर लक्ष ठेवून त्यांना प्रशासनाच्या ताब्यात देणे अथवा प्रशासनाकडे तक्रारी करणं ही जिल्ह्यातील सुजाण जनतेची जबाबदारी आहे. भ्रष्टाचाराच्या विळख्यात असलेल्या उत्पादन शुल्क खात्याने आता तरी इमानदारीने वागावे, असेही अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.