Home » देश-विदेश » लग्न लावणा-या विरुद्ध गुन्हा दाखल.

लग्न लावणा-या विरुद्ध गुन्हा दाखल.

लग्न लावणा-या विरुद्ध गुन्हा दाखल.

डोंगरचा राजा / आँनलाईन

– जिल्हाधिकारी यांचा आदेश डावलला, लग्न लावणार्या आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल.

माजलगाव- तालुक्यातील ब्रम्हगाव येथे कोरोना संसर्गाबाबत जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी आदेश डावलत जमाव जमवून लग्न लावणार्या भटजी,फोटोग्राफरसह आठ जणांना गुरुवारी पोलीस कोठडींची हवा खावी लागली.
माजलगाव शहरापासून 1 किमी अंतर असलेल्या ब्रम्हगाव येथे दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास लग्नासाठी जमाव जमला असल्याची माहीती पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांना मिळाल्यानी त्यांनी शहर पोलीसांना लग्नस्थळी पोलीसांना जावयास सांगितले.त्यावरुन सहाय्यक पो.निरीक्षक पोलीस ताफा घेवून लग्नस्थळी गेले असता त्याना लग्न स्थळी 100-125 लोक जमल्याचे दिसून आले.त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांचा कोरोना संसर्ग बाबत आदेश असल्याचे भोंग्यातुन उदघोषणा करुन आपआपल्या घरी जाण्यास सांगितले असतांनाही नकारदेत लग्न लावण्याचा प्रयत्न केला.तेव्हा पोलीसांनी लग्न लावण्यास आलेले भटजी,फोटोग्राफरसह आठ जणांना ताब्यात घेवून त्यांच्यावर शहर पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक आविनाश राठोड यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा करण्यात आला यानंतर पाच सहा नातेवाईकांनी लग्न उरकुन घेतल्याचे सांगितले जात आहे.कारवाई करण्यास गेलेल्या पोलीसामध्ये पो.हे.शरद पवार,पो.ना.किशोर राऊत,पो.ना.अजय सानप,एल.पी.सी.ज्योती केले, चालक विनायक अंकुश आदीचा समावेश होता.या घटनेने काही दिवसात लग्न आसणांरा मध्ये खळबळ माजली आहे.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल विठ्ठल पांडुरंग कांबळे रा.ब्रम्हगाव ता.माजलगाव (नवरीचे वडील), मनकर्णा सुभाष पाटोळे रा लवुळ ता.माजलगाव (नवरदेवाची आई)ज्ञानेश्वर उद्धव पाटोळे रा.लवूळ(नवरदेवाचे चुलते), चंदू महादेव आटवे रा.लवुळ(नवरदेवाचे मामा) ,कैलास सुदाम कसाब रा.गोळेगाव ता.परतुर(नवरीचा मामा) सुनील सुदाम वैराळ रा.सांवगी ता.परतुर(सोकान्या), स्वप्निल अनिल कुलकर्णी रा.डेपेगाव ता.माजलगाव (भटजी), गणेश अनंत मारगुडे रा.खानापुर(फोटोग्राफर) यांचा समावेश

Leave a Reply

Your email address will not be published.