Home » माझा बीड जिल्हा » बीड जिल्ह्याच्या मार्गांवर 14 चेक पोस्ट.

बीड जिल्ह्याच्या मार्गांवर 14 चेक पोस्ट.

बीड जिल्ह्याच्या मार्गांवर 14 चेक पोस्ट.

डोंगरचा राजा / आँनलाईन

– बाहेरून येणाऱ्या व्यक्तींच्या माहिती घेण्यासाठी जिल्ह्यातील मार्गांवर 14 चेक पोस्ट-मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार

कोविड -19 चा बीड जिल्ह्यात संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य, शिक्षण आणि पोलीस विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेली 14 पथके स्थापन करण्यात येत आहेत अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.
यासाठी पुणे ,मुंबई या कोरोना प्रादुर्भाव झालेल्या शहर व भागातून येणाऱ्या व्यक्तींची माहिती एकत्रित करण्यासाठी येणाऱ्या मार्गांवर ५ चेक पोस्ट व परदेशातून येणाऱ्या व्यक्तींची माहिती एकत्रित करण्यासाठी जालना परभणी उस्मानाबाद लातूर या जिल्ह्यातून येणाऱ्या मार्गांवर ९ चेकपोस्ट स्थापन करण्यात येत आहेत . यासाठी 8 -8 तासांच्या शिफ्टमध्ये पथके कार्यान्वित करण्यात येत आहेत .
चेक पोस्ट च्या माध्यमातून नियुक्त केला जाणाऱ्या प्रत्येक पथकामध्ये दोन पोलीस कर्मचारी दोन शिक्षक आणि एक आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. कोरोना विषाणूचा बाधित व्यक्तींपासून होणारा संसर्ग रोखण्यासाठी इतर जिल्हे आणि परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती एकत्रित करण्यात येणार आहे. संबंधित प्रवासी व्यक्तींकडून ह्या पथकाद्वारे त्यांच्या प्रवासाचा तपशील नाव पत्ता संपर्क क्रमांक इत्यादी माहिती एकत्रित केली जाणार आहे. या पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सर्व संबंधितांनी आवश्यक माहिती पुरवून सहकार्य करावे असे आवाहन श्री कुंभार यांनी केले आहे.
चेक पोस्ट स्थापन करण्यात येणारी ठिकाणे पुढील प्रमाणे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.