Home » माझा बीड जिल्हा » दुकाने,पान टपरी बंद करण्याचे आदेश.

दुकाने,पान टपरी बंद करण्याचे आदेश.

दुकाने,पान टपरी बंद करण्याचे आदेश.

डोंगरचा राजा / आँनलाईन

– तंबाखू, गुटखा, सिगारेट विक्री करणारे दुकाने, पान टपरी बंद करण्याचे आदेश

बीड – तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करुन सार्वजनिक ठिकाणी धुंकणे व धुम्रपान करणे यामुळे करोना विषाणू (COVID-19) चा प्रसार व प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे असे पदार्थ विक्री करणारी दुकाने व पान टपरी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
या आदेशात म्हटले की, करोना विषाणूचा (COVID-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून बीड जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इ. ची विक्री करणारी सर्व दुकाने/ पान टपन्या इ. दि.31 मार्च, 2020 पर्यंत बंद ठेवण्यात यावीत असे आदेशीत करन्यात आले आहे.

या आदेशानुसार सर्व मुख्याधिकारी न.पा./न.पं. व सर्व ग्रामसेवक यांनी तात्काळ कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीची दैनंदिन माहिती/ अहवाल सादर करण्याची दक्षता घ्यावी. यावर नियंत्रण अधिकारी म्हणुन उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रा.पं. जि.प., बीड, पोलीस उपअधीक्षक (गृह), सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, बीड यांची नेमणुक करण्यात आली आहे.

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना “महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम, 2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनिय/ कायदेशीर कारवाईस पात्र राहील. असे आदेशात नमूद केले आहे.

सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.