Home » माझी वडवणी » कोरोना; वडवणीत हॉटेल देवाचा उपक्रम.

कोरोना; वडवणीत हॉटेल देवाचा उपक्रम.

कोरोना;वडवणीत हॉटेल देवाचा उपक्रम.

डोंगरचा राजा / आँनलाईन

– कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वडवणीत हॉटेल देवाचा उपक्रम

– प्रत्येक ग्राहक व प्रवाशांना हात धुण्यासाठी डेटॉल व साबण केले उपलब्ध

वडवणी – दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरणा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता एक सजग नागरिक या नात्याने वडवणी शहरातील हॉटेल देवा याठिकाणी हॉटेलचे मालक मुरली देवा कोहाळे यांच्या वतीने अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहक व प्रवाशांना स्वच्छ हात धुण्यासाठी डेटॉल, सॅनीटायझर व साबण अशी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वडवणी शहरातील प्रत्येक सुजाण नागरिकाने वेळोवेळी आपल्या हातांची स्वच्छता राखून कोरोना बाबत सजग व सतर्क राहायला हवे हाच यामागील हेतू असल्याची भावना मुरली कोहाळे यांनी बोलून दाखविली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या संपूर्ण भारत देशासह जगभरात कोरोना विषाणू प्रादुर्भावाने थैमान घातले आहे. प्रशासकीय स्तरावर यासाठी कठोरपणे उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात असून प्रशासन सर्व नागरिकांना आपल्या आरोग्याची व हातांच्या स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव मुख्यतः तोंड, नाक, चेहरा व हाताद्वारे होत असल्याने यासाठी प्रत्येकाने योग्य ती खबरदारी क्षणोक्षणी घेत राहावी असेही सांगितले जात आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता एक सजग नागरिक या नात्याने वडवणी शहरातील नगरपंचायत कार्यालयाच्या परिसरात असलेल्या हॉटेल देवा याठिकाणी हॉटेलचे मालक मुरली देवा कोहाळे यांच्या वतीने अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून याठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहक व प्रवाशांना स्वच्छ पाण्याने चेहरा व हात धुण्यासाठी डेटॉल, सॅनीटायझर व साबण अशी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वडवणी बस स्थानक परिसरात दैनंदिनपणे नागरिक व प्रवाशांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. याठिकाणी बाहेरगावाहून प्रवासी येतात व येथील रहिवाशी बाहेरगावी जातात परिणामी या ठिकाणी स्वच्छतेविषयी जागरुक असणे अत्यंत गरजेचे आहे. आणि हीच गरज लक्षात घेऊन मुरली कोहाळे यांनी माणुसकी दाखवत सर्व नागरिक, ग्राहक व प्रवाशांसाठी स्वखर्चातून ही संकल्पना सुरु केली आहे. तरी वडवणी शहरातील प्रत्येक सुजाण नागरिकाने वेळोवेळी आपल्या हाता तोंडाची स्वच्छता राखून कोरोना बाबत सजग व सतर्क राहायला हवे हाच यामागील हेतू असल्याची भावना मुरली कोहाळे यांनी बोलून दाखविली. यावेळी शासकीय अधिस्विकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ, साप्ताहिक डोंगरचा राजाचे संपादक अनिलराव वाघमारे, नगरसेवक महादेवराव जमाले, नगरसेवक संभाजी तात्या शिंदे, नगरसेवक शेषेराव बाप्पु जगताप, नगर पंचायतचे कार्यालयीन अधिक्षक आयुब पठाण, कर्मचारी बाबुराव तिडके, हॉटेल उद्योजक बाबासाहेब कुरकुटे, राहुल वावधाने यांसह एस.टी.महामंडळ कर्मचारी तसेच प्रवाशी, तरुण, युवक उपस्थित होते. सर्वांनी आपल्या हातांची यावेळी स्वच्छता करुन या उपक्रमास सुरुवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published.