Home » ब्रेकिंग न्यूज » कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.

कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.

कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.

डोंगरचा राजा / आँनलाईन.

– जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

– प्रस्ताव जाणार – अँड.अजित देशमुख

बीड – बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. बीड एक वेळ शेतकऱ्याची कणा समजली जात होती. मात्र गेल्या काही वर्षापासून या बँकेने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सातत्याने भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अडकून पडलेली ही बँक सुधारण्याची सतराम शक्यता नाही. अँड. अजित देशमुख यांच्या तक्रारीवर गंभीर दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी या बँकेच्या संचालक मंडळावर योग्य ती कठोर कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, लातूर यांना पाठवण्याचा आदेश दिला आहे. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणार आहे.

जिल्हा बँकेत वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये बोगसगिरी झालेली आहे. आजही कर्जमाफीच्या प्रकरणांमध्ये कित्येक लाख नव्हे तर काही कोटी रुपये बोगस आलेले आहेत. संचालक मंडळाला ही बाब माहित आहे. मात्र ते भ्रष्ट कारभारात गुंतलेले असल्याने कोणतीही कारवाई होत नाही.

खरीप २०१५ मधील बोगस पीक विम्याची रक्कम रुपये अठरा कोटी जिल्हा बँकेने स्वतःजवळ ठेवून शासनाची आणि विमा कंपनीची फसवणूक केली होती. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करून ही रक्कम व्याजासह वसूल करून दोषींना जेलमध्ये घालण्याची मागणी अँड. अजित देशमुख यांनी केली होती. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर ही सहकार खात्याकडून या तक्रारीला न्याय मिळत नव्हता.

शेवटी अँड. देशमुख यांनी हे प्रकरण जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बैठकीत नेले. दिनांक ३ मार्च २०२० रोजी जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते खाली झाली. यावेळी ही तक्रार चर्चेला आली आणि प्रकरणाची गंभीर स्वरूप पाहून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या प्रकरणात दोषींवर तात्काळ कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त करत, त्याचा प्रस्ताव तात्काळ पाठवण्याचे आदेश दिलेले आहेत. यामुळे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासह कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

विमा कंपनीकडून अतिरिक्त मिळालेली रक्कम रुपये तीन लाख एवढी रक्कम चार वर्षानंतरही जिल्हा बँकेने परत केले नाही. ही गंभीर अनियमितता आहे. जिल्हा बँकेने सहाशे एक्काव्वन कोटी रुपये इतकी पीक विम्याची रक्कम मुदतीमध्ये गुंतवून त्यातुन चार कोटी ७३ लाख रुपये मिळविले होते. व्याजाची रक्कम उत्पन्न समजून वापरली होती. अशा प्रकारे ही रक्कम वापरता येते का ? हा प्रश्न देखील वादातीत आहे. यावर कुठलाही समाधान कारक पुरावा अथवा उत्तर सहकार विभागाने दिलेले नाही.

विशेष म्हणजे या बैठकीला जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था आणि जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हजर होते. त्यामुळे या दोन्ही मुद्यांसह अन्य मुद्यांवर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ योग्य ती कारवाई करण्याचा प्रस्ताव विभागीय सह निबंधकाना सादर होणार आहे. एकूणच बँक पुन्हा एकदा चर्चेत आली असून आता कारवाई अटळ आहे, असे अँड. देशमुख यांनी म्हंटले आहे.

——–
चौकट
———-
आपल्या बावीस ते पंचवीस वर्षाच्या सामाजिक कामा दरम्यान आपण अनेक अधिकारी आणि कर्मचारी पाहिले. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे सध्यातरी कायद्याप्रमाणे चालणारे अधिकारी म्हणून वावरताना दिसतात. ते असेच कायद्याप्रमाणे चालत राहिले तर भू संपादनातील बोगस एन. ए. मुळे द्यावा लागणारा काही कोटी रुपयांचा मावेजा वाचणार आहेत. सरकारचा यात फायदा होईल. रेल्वेचं अतिरिक्त भु संपादन तोंड वर काढणार नाही. त्याच प्रमाणे जनतेची कामेही होतील, असे देशमुख यांनी म्हटले आहे.
———

Leave a Reply

Your email address will not be published.