Home » ब्रेकिंग न्यूज » जन्मोत्सव एप्रिलमध्ये-पत्रकार हातागळे

जन्मोत्सव एप्रिलमध्ये-पत्रकार हातागळे

जन्मोत्सव एप्रिलमध्ये-पत्रकार हातागळे

डोंगरचा राजा / आँनलाईन

– कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर २१ मार्चला होणारा राष्ट्रमाता जिजाऊ-क्रांतीज्योती साविञीमाई फुले व माता रमाई आंबेडकर यांच्या संयुक्त जन्मोत्सव कार्यक्रम एप्रिलमध्ये होणार-पत्रकार रोहिदास हातागळे यांची माहिती

अंबाजोगाई तालुक्यातील मौजे कुंबेफळ येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी राष्ट्रमाता जिजाऊ,क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले व माता रमाई आंबेडकर यांच्या संयुक्त जन्मोत्सव आयोजित करण्यात आला होता.मात्र सध्याची परिस्थिती पाहता दि.२१ मार्च २०२० रोजी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम एप्रिल महिन्यांत होणार असल्याची माहिती क्रांतीसूर्य फुले-शाहू-आंबेडकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे संयोजक पत्रकार रोहिदास हातागळे,संजय कुंबेफळकर (अध्यक्ष,अस्तित्व बहुउद्देशिय सेवाभावी संस्था,कुंबेफळ) यांनी संयुक्तरित्या काढलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

गेल्या सहा वर्षांपासून अंबाजोगाई तालुक्यातील मौजे कुंबेफळ येथे राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, माता रमाई आंबेडकर यांच्या संयुक्त जन्मोत्सव साजरा केला जातो.१ली ते १० वी च्या विविध स्पर्धा घेतल्या जातात.त्याचे पारितोषिक वितरण तसेच कर्तृत्ववान व्यक्तींचा गुणगौरव करण्यात येतो.यंदाचे हे सातवे वर्ष आहे.मात्र सध्या कोरोनो व्हायरस या संसर्ग आजाराच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करून एप्रिल महिन्यांत घेण्याचे ठरवले आहे.यावर्षी या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण सिनेअभिनेत्री साक्षी आंधळे या आहेत.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.वृंदावनी वसंतराव भोसले (कुंबेफळ) तसेच यावेळी शिवसंग्रामचे संस्थापक,अध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे हे उद्घाटक असणार आहेत.विशेष अतिथी म्हणून जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा,बीड जि.प.च्या सभापती शिवकन्या सिरसाट,जिल्हा बँकेचे संचालक दिनेशकाका परदेशी,बीआरएसपीचे माजी महाराष्ट्र प्रदेशसचिव अॅड. माणिक आदमाने,अंबाजोगाई पं.स.च्या सभापती विजयमाला जगताप,मराठी पत्रकार परीषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर,प्रहारचे डॉ. संतोष मुंडे,सामाजिक कार्यकर्त्या अंजली पाटील, नगरसेविका वासंती बाबजे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार होती.मात्र कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करून पुढे एप्रिल महिन्यात घेण्यात येणार असल्याची माहिती क्रांतीसूर्य फुले-शाहू-आंबेडकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे संयोजक पत्रकार रोहिदास हातागळे,संजय कुंबेफळकर (अध्यक्ष,अस्तित्व बहुउद्देशिय सेवाभावी संस्था,कुंबेफळ) यांनी संयुक्तरित्या काढलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.