Home » माझा बीड जिल्हा » ट्रॅव्हल्स वाल्यांकडून ग्राहकांची लूट – अँड.अजित देशमुख.

ट्रॅव्हल्स वाल्यांकडून ग्राहकांची लूट – अँड.अजित देशमुख.

ट्रॅव्हल्स वाल्यांकडून ग्राहकांची लूट – अँड.अजित देशमुख.

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड – बीड ते मुंबई आणि बीड ते पुणे जाताना कमी मात्र परत येताना दुपटीने भाडे घेतले जात आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने याकडे तात्काळ लक्ष घालावे. ट्रॅव्हल्स मधून उतरणाऱ्या ग्राहकाकडे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून किती भाडे घेतले, याची विचारपूस करून ट्रॅव्हल्स चालक आणि मालकावर गुन्हा दाखल करावा आणि ग्राहकांची लूट थांबवावी, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी केले आहे.

बीड ते पुणे आणि पुणे ते बीड त्याप्रमाणे बीड ते मुंबई आणि मुंबई ते बीड भाडे गेल्या आठ दिवसापूर्वी कमी असायचे. मात्र आता ट्रॅव्हल वाल्यानी हे भाडे दुपटी वर नेले असल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात येत आहे. परत येताना चे भाडे वाढले असले तरी यावर कुणाचाही अंकुश नसल्याचे दिसते.

कोरोना मुळे घाबरलेले लोक पुणे आणि मुंबई कडून बीड कडे परत येत असताना ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. ही लूट ताबडतोब थांबली पाहिजे. परतीचा प्रवास आणि पुण्या, मुंबईत शिकायला, कामाला गेलेली मुले, माणसं सध्या परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ही लूट जाणीव पूर्वक केली जात आहे. प्रशासनाने याकडेही तात्काळ लक्ष घालावे, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.