Home » माझा बीड जिल्हा » प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

– कोरोनावर नियंत्रण राखण्यासाठी प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी राहुल रेखावार.

डोंगरचा राजा / आँनलाईन
– आयोजकांनी गर्दीचे कार्यक्रम आयोजित करू नये

– नागरिकांनी गर्दीची ठिकाण समारंभ, कार्यक्रम टाळावेत

बीड – कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण राखण्यासाठी प्रशासन समर्थ आणि सज्ज आहे व प्रत्येक नागरिका सोबत आहे . शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजकांनी जिल्ह्यात गर्दीचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नये व ते पुढे ढकलावेत. नागरिकांनी गर्दीची ठिकाण समारंभ, कार्यक्रम टाळावेत असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
आकाशवाणी बीडच्या एफएम 102.9 मेगाहर्टज या वाहिनीवरून जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मुलाखतीचे प्रसारण करण्यात आले . यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आजित कुंभार आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात यांची मुलाखत आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी जयंतकुमार शेटे यांनी घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. रेखावार बोलत होते.
मुलाखतीमध्ये बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले ,कोरोना विषाणू संसर्ग आजारावर सध्या कोणताही इलाज नाही, त्यामुळे जगात चिंतेचं वातावरण असलं तरीही आपण भीती बाळगण्याची गरज नाही.सर्व प्रकारची सज्जता करण्यात आले. आहे यासाठी प्रशासनाने खाजगी हॉस्पिटल हीदेखील संपर्क राखून पूर्ण तयारी केली आहे. जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा असून कोणताही तुटवडा नाही. आपली स्वतःची काळजी घेऊन आपला परिवार आपला समाज जिल्हा व पर्यायाने आपला देश सुरक्षित ठेवू शकतो.
श्री. रेखावार यांनी पुढे सांगितले , हा आजार विषाणूंच्या संसर्गाने पसरत आहे आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासन व शासनाच्यावतीने देत असलेल्या योग्य माहितीचे उपयोग करून आपण स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे यामध्ये आपला हात वारंवार स्वच्छ धुणं, कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी बोलताना कमीतकमी साडेतीन फुटांपेक्षा जास्त अंतर राखणे , गर्दीची ठिकाणं – सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी अनेक जणांचा संपर्क येतो टाळणे तसेच सार्वजनिक वापराच्या वस्तूंना हात लागतो अशा ठिकाणी काळजी घेणे. सध्या आपल्याकडे मास्कची गरज नाही. फक्त वैद्यकीय तज्ञ व कर्मचाऱ्यांना त्याची गरज आहे , आपल्याला आवश्यकता वाटल्यास स्वच्छ हात रुमालाचा वापर आपण करू शकतो ही गोष्ट ध्यानात घेणे हे गरजेचे आहे असे जिल्हाधिकारी म्हणाले .
ते म्हणाले ,पर्यटक व भारतातील परदेश गेलेले नागरिक यांनी परत आल्यानंतर आपली संपूर्ण माहिती प्रशासनाला द्यावी. प्रशासनाच्या वतीने त्यांची काळजी घेतली जाईल, निगरानी ठेवून वारंवार संपर्क राखला जाऊन आवश्यक तपासण्या केल्या जातील . यासाठी ज्यांना अशी लक्षणं आढळतात अशा नागरिकांची काळजी घेण्यासाठी असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.
*विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी शाळांना सूचना*
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुंभार म्हणाले महाराष्ट्रातील विविध ठिकाणी रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील रुग्णांची काळजी घेण्यासाठी प्रशासन आवश्यक ती उपाययोजना करत आहे याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांची देखील काळजी घेण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना काही सर्दी, खोकला , ताप असल्यास शक्यतो त्याला शाळेत पाठवू नये .पण परीक्षेसारखी महत्त्वाची वेळी अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशा सूचना शाळांना देण्यात आल्याचे अजित कुंभार यांनी सांगितले
ते म्हणाले , ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, दवाखाने , रुग्णालयात यासाठी पुरेसा औषधाचा साठा करण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये याबरोबरच महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियातून देखील वेगवेगळी माहिती असते ,यामधील अफवांना आपण बळी पडू नये. काय करावे , काय खावे, काय खाऊ नये याबाबत विचार करून अधिकृत माहितीचा वरच विश्वास ठेवावा . असे चुकीचे काही हे संदेश अथवा अफवा पसरवल्या जात असतील तर पोलीस विभागात कायद्यानुसार कारवाईसाठी प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वतः घाबरून जाऊ नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले.
*जिल्ह्यात असे कोणतेही संशयित रुग्ण आढळून आले नाही*
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .थोरात म्हणाले या आजारांमध्ये प्रामुख्याने दिसणाऱ्या लक्षणे फ्लू सारखी असली, तरी सतत गळणारं नाक या आजारात दिसून येत नाही . पण खोकला , घशात खवखव होत असेल , ताप येत असेल तर आपण तपासून घ्यावं. बीड जिल्ह्यात असे कोणतेही संशयित रुग्ण आढळून आले नाही , त्यामुळे काळजीचे कारण नाही . त्यामुळे काही अफवा आपण ऐकली असल्यास यावर अजिबात विश्वास ठेवू नये असे जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.