वेब कास्टिंगवर सव्वा दोन कोटी खर्च – अँड.अजित देशमुख
लोकसभा निवडणुकीत संवेदनशील मतदारसंघाच्या नावाखाली वेब कास्टिंग वर सव्वा दोन कोटी खर्च
डोंगरचा राजा / आँनलाईन
बीड – निवडणूक काळात झालेल्या खर्चाचे ऑडिट होत नसते. कोणी विचारत नाही. अशा अनेक सबबीखाली निवडणुकीत खर्च केला जातो. बीड जिल्ह्यात या लोकसभा निवडणुकीत संवेदनशील मतदार केंद्रात वाढ करून वेब कास्टिंग वर चक्क सव्वा दोन कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत राजकीय पक्षाचे वागणे पाहून या केंद्रात मतदारांनी शांततेत मतदान केले. त्यामुळे वेब कास्टिंगचा खर्च विनाकारण वाढला असल्याचा आरोप जण आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केला आहे.
लोकसभा मतदार संघातील संवेदनशील मतदान केंद्रावर वेब कास्टिंग तंत्रज्ञानद्वारे नियंत्रण कक्षातून नियंत्रण ठेवण्यात येते. हा कक्ष बीड लोकसभा मतदार संघासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे होता. मतदान केंद्रावरील हालचालीवर प्रशासनाने “वॉच” ठेवावा, असे यातून अपेक्षित आहे.
मात्र यातून जिल्ह्यात काहीही साध्य करता आले नाही. मतदान केंद्रावरील गैरप्रकार यात पाहिले की नाही, हे माहीत नाही. मात्र वेब कास्टिंग च्या नावाखाली जवळपास सव्वादोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. संवेदनशील मतदारसंघ मागच्या निवडणुकीत कमी होते. मात्र बीड जिल्ह्यात या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार संघाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्याचे देखील तक्रार आहे.
वेब कास्टिंग यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबविण्याच्या उद्देशाने हे घडले असल्याची तक्रार आहे. तक्रारीच्या चौकशीत काय साध्य होईल ते होईल. मात्र या तक्रारीत वर – वर पाहता तरी तथ्य वाटते.
इतके मोठे बिल देताना सध्याचे जिल्हाधिकारी रेखावार कोणती भूमिका घेतात. हे येणारा काळच ठरवणार आहे. मात्र एकंदरीत या घोटाळ्या मधून अधिकाऱ्यांना सुट्टी मिळणार नाही. चौकशी समितीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. विभागीय आयुक्त हे देखील योग्य भूमिका घेतील. तरीही आमच्याकडे सर्व पर्याय खुले आहेत, असे अँड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.