Home » माझा बीड जिल्हा » सभापती अशोक डक यांचे जंगी स्वागत.

सभापती अशोक डक यांचे जंगी स्वागत.

सभापती अशोक डक यांचे जंगी स्वागत.

– प्रेमाने भारावून गेलो – अशोक डक

डोंगरचा राजा / आँनलाईन

माजलगाव – मुंबई बाजार समिती निवडणुकीत औरंगाबाद महसुल विभागातून विक्रमी मताने संचालकपदी विजयी झाल्याबद्दल माजलगाव शहरात प्रथमच सभापती अशोक डक यांचे गुरूवारी आगमन होताच. ठिक-ठिकाणी फटक्याची आतषबाजी करत ढोलताशाच्या गजरात जंगी स्वागत शहरवासीयांच्या वतीने करण्यात आले.
माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक याच्या रूपाने प्रथमच मुंबई बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत संधी महाविकास आघाडीकडून संधी मिळाली. या संधीच सोनं करत औरंगाबाद महसुल विभागातून विक्रमी मताधिक्यांनी डक हे विजयी झाले. संचालक मंडळातील विजयानंतर प्रथमच शहरात गुरूवार दि.5 रोजी सायं. 7 वा. आगमन होताच सुशिलभैय्या डक मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी चौक, छत्रपती शिवाजी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गे हनुमान चौक फटाक्याची आतषबाजी करत ढोलताशाच्या गजरात रॅली काढण्यात आली. या दरम्याण ठिक-ठिकाणी व्यापारी, कार्यकर्ते व शहरवासीयांकडून सत्कार करण्यात आले. पुढे या सत्कार कार्यक्रमास रॅलीचे स्वरूप प्राप्त होवून डक यांच्या निवासस्थानी सांगता झाली.
—————————–

माजलगावकरांच्या प्रेमाने भारावून गेलो – अशोक डक
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवडून आल्यानंतर शहरातून समर्थक, चाहते आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी उत्साहात स्वागत केले. जल्लोषपुर्ण झालेली मिरवणुक आणि सत्कारामुळे मी भारावून गेलो असून जनतेच्या कायम ऋणी राहिल असे प्रतिपादन सभापती अशोक डक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.