Home » माझी वडवणी » ना.मुंडेंनी नवजात शिवकन्येची घेतली भेट.

ना.मुंडेंनी नवजात शिवकन्येची घेतली भेट.

ना.मुंडेंनी नवजात शिवकन्येची घेतली भेट.

डोंगरचा राजा / आँनलाईन

– पालकमंत्री धनंजय मुंडेंनी पालकत्व स्वीकारलेल्या नवजात शिवकन्येची घेतली भेट

परळी वैजनाथ – जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथील रांदड हॉस्पिटलमध्ये जाऊन चार दिवसांपूर्वी पालकत्व स्वीकारलेल्या शिवकन्येची भेट घेतली. २४ फेब्रुवारी रोजी रेल्वे पटरी नजीक सापडलेल्या नवजात अर्भकाची माहिती कळताच तात्काळ त्या बाळाचे पालकत्व स्वीकारून धनंजय मुंडेंनी त्यांच्या संवेदनशीलतेचा परिचय दिला होता.

तराज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबईत होते. त्यावेळी सहकाऱ्यांकरवी त्या बाळाच्या उपचारांची शहरातील खाजगी रुग्णालयात सोय केली होती. त्यांनंतर परळीच्या दौऱ्यात येताच आवर्जून बाळ शिवकन्येच्या तब्येतीची पहाणी करण्यासाठी दवाखान्यात जाऊन भेट दिली.

यावेळी बाळाची तब्येत उत्तरोत्तर सुधारत असून अजून काही दिवस दवाखान्यातच ठेवावे लागेल असे डॉ. विजय रांदड यांनी सांगितले. यावेळी ना. मुंडे यांच्यासोबत डॉ. संतोष मुंडे, बाजीराव धर्माधिकारी, सुंदर गित्ते, विष्णू चाटे, कुमार व्यवहारे हे उपस्थित होते.

समाजाला नकोशी झालेल्या या नवजात शिवकन्येला तिच्या अल्पवयीन मातेने काटेरी झुडुपात टाकून दिले होते. याबाबत माहिती मिळताच पालक मंत्री श्री मुंडे यांनी या बाळाचे पालकत्व खा. सुप्रिया सुळे यांच्या मदतीने घेणार असल्याचे सांगत तिच्यावर तातडीने आवश्यक उपचार करण्यासंबंधी सूचना केल्या होत्या. यावेळी उपस्थितांना व डॉक्टरांशी चर्चा करताना श्री मुंडे यांनी शिवकन्येची काळजी घेण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या .

Leave a Reply

Your email address will not be published.