Home » माझी वडवणी » वडवणीत पोलिसांचे सर्जिकल स्ट्राईक

वडवणीत पोलिसांचे सर्जिकल स्ट्राईक

वडवणीत पोलिसांचे सर्जिकल स्ट्राईक

डोंगरचा राजा / आँनलाईन

– २१ झेरॉक्स दुकानांवर कारवाई.

– परिक्षा वेळेत दुकान सुरु ठेवणे पडले महागात.

– झेरॉक्स चालकांचा बेमुदत बंद

वडवणी – जिल्हाधिकारी बीड यांनी सध्या सुरु असलेल्या १२ वी व १० वी परिक्षेच्या काळात होणाऱ्या काॅपी रोखण्यासाठी सर्व झेरॉक्स दुकाने परिक्षेच्या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तरी त्यांचा हा आदेश न पाळल्याने काल दि.२८ फेब्रुवारी २०२० शुक्रवार रोजी वडवणी शहरातील २१ झेरॉक्स दुकानांवर वडवणी पोलिसांनी अक्षरशः सर्जिकल स्ट्राईक करत छापे मारून चालकांवर वडवणी पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात सध्या १२ वीच्या परिक्षा सुरू असून तरी यामध्ये प्रतिवर्षी जिल्ह्यात काॅपीचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू असतो. तरी हा डाग पुसून काढण्यासाठी काॅपी मुक्त बीड जिल्हा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली असुन यामध्ये जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन परिक्षेच्या पेपर वेळेच्या एक तास अगोदर व परिक्षा पेपर सुटल्यानंतर एक तास सर्व झेरॉक्स दुकाने या वेळेत बंद करण्याचे लेखी आदेश दिले होते. तरी हे आदेश डावलून वडवणी शहरातील असंख्य झेरॉक्स चालक हे दुकान सुरु ठेवून चालवित होते. ही माहिती मिळाल्यावरून व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वडवणी पोलिसांनी काल दि.२८ फेब्रुवारी शुक्रवार रोजी वडवणी शहरातील २१ झेरॉक्स दुकानांवर थेट सर्जिकल स्ट्राईक करत छापे मारुन चालकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले व सर्वांवर भा.दं.वि. कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी या कारवाईने संपूर्ण वडवणी तालुक्यात खळबळ उडाली आहे. तसेच शहरातील सर्व झेरॉक्स दुकाने बंद राहिल्याने दिवसभर जनतेला त्रास सहन करावा लागला होता.

चौकट

अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ आजपासून बेमुदत बंद..

वडवणी शहरातील आम्हां सर्व सीएससी, व्हीएलई, व झेरॉक्स दुकान चालकांवर प्रशासनाने अन्यायकारक पद्धतीने कारवाई केली असून झेरॉक्स दुकान बंद ठेवण्यासंदर्भात आम्हांला प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती. तसेच सराईत गुन्हेगाराला पकडावे अशा क्रूरतेने सर्व झेरॉक्स चालकांना पोलिस प्रशासनाने पकडून पोलिस ठाण्यात नेले व चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करीत कारवाई केली. हा प्रकार अतिशय निंदनीय असून या अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ आज दिनांक २९ फेब्रुवारी २०२० शनिवार रोजीपासून वडवणी शहर व तालुक्यातील सर्व सीएससी, व्हीएलई व झेरॉक्स दुकान बेमुदत बंद ठेवणार असल्याची माहिती वडवणी तालुका सीएससी, व्हीएलई व झेरॉक्स दुकान युनियनचे अध्यक्ष पांडुरंग मुंडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.