Home » माझा बीड जिल्हा » रमेश आडसकरांचा पुढाकार तीन खरेदी केंद्र सुरू

रमेश आडसकरांचा पुढाकार तीन खरेदी केंद्र सुरू

रमेश आडसकरांचा पुढाकार तीन खरेदी केंद्र सुरू

डोंगरचा राजा / आँनलाईन

माजलगाव – माजलगाव येथे कापूस घालण्यासाठी शेतकऱ्यांच्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या असताना पणन महासंघाकडून केवळ दोनच कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला शुक्रवारी टीएमसी केंद्रावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. शेवटी माजलगाव मतदारसंघाचे नेते रमेश आडसकर पुढाकाराने यार्डमध्ये उभी असलेली कापसाची वाहने ग्रेडिंगसाठी सोडण्यात आली. तर आणखी एक खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे*.
*तालुक्यात यावर्षी कापसाचे *प्रचंड उत्पादन झाले असून त्यामुळे शेतकरी खुष आहे.आपला कापूस खरेदी केंद्रावर घालण्यासाठी शेतकरी दररोज खेटे मारत असून तालुक्यात अंबादास व मनकॉट जिनींग या दोन ठिकाणीच शासकीय खरेदी सुरू आहे, त्यामुळे तेथे शेतकऱ्यांनी कापूस घालून आणलेल्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या असल्याचे चित्र आहे. मात्र या ठिकाणी ग्रेडर ची मनमानी सुरू असल्याने शेतकऱ्यांना चार-चार दिवसांपासून वाहनांचे भाडे भरत दिवसरात्र तिष्ठत राहावे लागत होते त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटला. शुक्रवारी दुपारी टीएमसी केंद्रावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले तेथे* *माजलगाव मतदारसंघाचे नेते रमेश आडसकर शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले व तात्काळ संबंधित अधिकारी व ग्रेडर यांना प्रकरणाचे गांभीर्य सांगून इतर दोन खरेदी केंद्र सुरू करावयास* *भाग पाडले,तात्काळ पूर्वा जिनींग सुरू करण्यात आली तर सोमवारी आणखी एक जिनींग सुरू होणार आहे,त्यामुळे जवळपास चारशे वाहने कापूस तीन खरेदी केंद्रावर विभागून दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी रामेश्वर टवानी,रामू चांडक, ईश्वर खुर्पे,मनोज फरके उपस्थित होते*.

Leave a Reply

Your email address will not be published.