मराठी पत्रकार परिषदेची राज्यातील पहिली शाखा वडवणीत
वडवणी / प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, राज्य अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, बीड जिल्हा अध्यक्ष सुभाष चौरे यांच्या सूचनेवरून व राज्य कार्यकारणी सदस्य अनिल वाघमारे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन वडवणी तालुक्यात मराठी पत्रकार परिषदेची राज्यातील पहिली शाखा स्थापन करून तालुका अध्यक्षपदी विनायक जाधव, तालुका उपाध्यक्षपदी सुधाकर शिंदे, तालुका सरचिटणीसपदी सतीश सोनवणे, तालुका कार्याध्यक्षपदी अशोक निपटे, तालुका कोषाध्यक्षपदी शांतिनाथ जैन यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी पत्रकार परिषदेचे उल्लेखनीय कार्य मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहणारी मराठी पत्रकार परिषद. महाराष्ट्र राज्यात असून वडवणी तालुक्यात परिषदेची एक शाखा व्हावी म्हणून मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्याकडे अनिल वाघमारे यांनी संकल्पना मांडली होती.त्यांनी होकार दिल्यानंतर राज्याचे अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, बीड जिल्हा अध्यक्ष सुभाष चौरे यांच्याशी संपर्क करून वडवणी येथे एक व्यापक बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी विनायक जाधव,उपाध्यक्षपदी सुधाकर शिंदे, सरचिटणीसपदी सतीश सोनवणे, कार्याध्यक्षपदी अशोक निपटे तर कोषाध्यक्षपदी शांतिनाथ जैन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. व आगामी काळातील परिषदेचे ध्येयधोरणे यावर सांगोपांग चर्चा करण्यात आली. तसेच सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मावळते तालुका अध्यक्ष सुधाकर पोटभरे,पत्रकार हरी पवार, पत्रकार ओमप्रकाश साबळे, पत्रकार सुर्यकांत सावंत, पत्रकार आकाश पोटभरे, पत्रकार अनिल काळे, पत्रकार ओम जाधव, पत्रकार हनुमंत मात्रे, पत्रकार भागवत सावंत आदींची उपस्थिती होती..