Home » माझा बीड जिल्हा » परळीकरांनी अनुभवली बावनकशी नाट्य कलाकृती.

परळीकरांनी अनुभवली बावनकशी नाट्य कलाकृती.

परळीकरांनी अनुभवली बावनकशी नाट्य कलाकृती.

डोंगरचा राजा / आँनलाईन

– “संगीत संत तुकाराम” च्या निमित्ताने परळीकरांनी अनुभवली बावनकशी नाट्य कलाकृती.

– नाट्यरसिकांचा भरभरुन प्रतिसाद

परळी वैजनाथ – ऐतिहासिक व सामाजिक आशयाचे नाटक संगीत संत तुकाराम च्या निमित्ताने परळीकर नाट्य रसिकांनी बावनकशी नाट्य कलाकृतीची अनुभूती घेतली.या नाट्य कलाकृतीला परळीकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर जगद्गुरु तुकाराम महाराज व छत्रपती शिवराय यांच्या अनुपम भेटीचा क्षण सर्वांना अनुभवायला मिळाला.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संगीत संत तुकाराम नाटकाचा प्रयोग लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिरात घेण्यात आला. भक्ती-शक्ती च्या या नाट्य आनंद सोहळ्यात अनेक ऐतिहासिक संदर्भाचा अनुभव ‘याच देही याची डोळा’ सर्वांना अनुभवता आला. संपादक ज्ञानेश महाराव यांची निर्मिती असलेले व भूमिका असलेले त्याचबरोबर प्रति बालगंधर्व विक्रांत आजगावकर यांनी साकारलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या भूमिकेतील कसदार अभिनयाची नेत्रदीपक आदाकारी प्रेक्षकांनी अनुभवली. परळीत प्रथमच संगीत नाटक नाट्य रसिकांच्या भेटीला आले होते. डॉ. राम पंडित यांचे संगीत आणि सुनील देवळेकर यांच्या नेपथ्याने व संतोष पवार यांच्या दिग्दर्शनाने नटललीे ही नाट्यकलाकृती सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली.
या नाटकाचे उद्घाटन जि. प. गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाजीराव धर्माधिकारी, बाळासाहेब देशमुख, सुरेश टाक, डॉ.प्रा. विनोद जगतकर, वैजनाथ सोळंके, तुळशीराम पवार, आयुब पठाण, रमेश भोईटे, राजा खान पठाण, किशोर पारधे, राधाकृष्ण साबळे, गोपाळ आंधळे, विजय भोईटे, शंकर आडेपवार, संजय फड, आनंत इंगळे, अनिल आष्टेकर, गोविंद कुकर, संतोष शिंदे, संजय सुरवसे, दीपक तांदळे, सेवकराम जाधव, दत्ता सावंत, रवी मुळे, दिनेश गजमल, जितेंद्र नव्हाडे, शंकर कापसे, श्रीकांत माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. नाटकाला परळीतील नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.