Home » महाराष्ट्र माझा » ना.मुंडे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथांचे दर्शन.

ना.मुंडे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथांचे दर्शन.

ना.मुंडे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथांचे दर्शन.

डोंगरचा राजा / आँनलाईन

– महाशिवरात्री निमित्त धनंजय मुंडे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथांचे दर्शन…

– फराळ वाटपात झाले सहभागी, तर सोमेश्वर संस्थानच्या पालखीलाही खांदा दिला.

परळी – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (दि.२१) महाशिवरात्री निमित्त १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच महोत्सवानिमित्त परळीत आलेल्या भाविकांना महाशिवरात्री निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी वैद्यनाथ मंदिर कमिटीच्या वतीने ना. मुंडे यांचे स्वागत करण्यात आले.

वैद्यनाथ मंदिर परिसरात भाविकांसाठी परळी नगर परिषदच्या वतीने मोफत फराळ व खिचडी वाटप आयोजित करण्यात आले होते. या फराळ वाटपात ना. मुंडे यांनी सहभागी होऊन फळे व खिचडी वाटप केली. त्याचबरोबर परिसरात यात्रेनिमित्त उभारलेल्या विविध स्टॉल्स ला भेटी दिल्या.

*सोमेश्वर संस्थान पालखी…*

दरम्यान परळी शहरापासून जवळच असलेल्या जिरेवाडी येथील सोमेश्वर संस्थान च्या पालखी सोहळ्यासही धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली. ही पालखी जिरेवाडी येथून वाजत गाजत वैद्यनाथ मंदिरापर्यंत जाते अशी परंपरा आहे. प्रतिवर्षी प्रमाणे श्री.मुंडेंनी या पालखी सोहळ्यात सहभागी होत पालखीला खांदाही दिला.

यावेळी पालकमंत्री श्री. मुंडे यांच्यासह आ. संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्या शिरसाट, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गोविंद फड, जि. प. सदस्य डॉ. मधुकर आघाव, अजय मुंडे, दत्ता आबा पाटील, बाजीराव धर्माधिकारी यांसह पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.