Home » माझी वडवणी » डॉ.पुर्भे यांचा २० वर्षांपासूनचा उपक्रम.

डॉ.पुर्भे यांचा २० वर्षांपासूनचा उपक्रम.

डॉ.पुर्भेंचा २० वर्षांपासूनचा उपक्रम.

डोंगरचा राजा / आँनलाईन

– महाशिवरात्रीनिमित्त हरिश्चंद्र पिंपरीत मोफत सर्वरोग निदान व औषधोपचार शिबीर

– अश्विनी हॉस्पिटलचे डॉ.भाऊसाहेब पुर्भे यांचा २० वर्षांपासून अभिनव उपक्रम

वडवणी – प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी आज दिनांक २१ फेब्रुवारी २०२९ शुक्रवार रोजी सकाळी ठीक १० वाजता वडवणी तालुक्यातील राजा हरिश्चंद्र पिंपरी याठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त अश्विनी हॉस्पिटल व रोटरी क्लब ऑफ वडवणी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशा मोफत सर्वरोग निदान व मोफत औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचा सर्व गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अश्विनी हॉस्पिटलचे संचालक डॉ.भाऊसाहेब पुर्भे यांचा मागील २० वर्षांपासूनचा हा गोरगरीब रुग्णसेवेचा अभिनव उपक्रम अविरतपणे सुरूच आहे.
या मोफत सर्वरोग निदान व मोफत औषधोपचार शिबिराचे उदघाटन आज शुक्रवारी सकाळी ठीक १० वाजता होणार असून यावेळी सत्यवादी राजा हरिश्चंद्र तीर्थक्षेत्राचे महंत भगवान महाराज राजपूत, रेणुकामाता संस्थानचे प्रमुख अण्णामहाराज दुटाळ, ज्येष्ठ नेते अंकुशराव शिंदे पाटील, ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ, युवा नेते भारत जगताप, युवा नेते संतोष डावकर, शिवसेना नेते विनायक मुळे, संतोष शिंदे पाटील, लक्ष्मणराव भंडारे, सरपंच हरिभाऊ पवार, मोहनदादा जगताप मित्र मंडळाचे तालुकाध्यक्ष बंडू नाईकवाडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.रवींद्र मुंडे, सचिव संतोष गोंडे, सर्व रोटरी क्लब ऑफ वडवणीचे पदाधिकारी सदस्य, यांसह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी वडवणी तालुक्यासह बीड येथून रुग्णांच्या वैद्यकीय तपासणी व चिकित्सेसाठी वैद्यकीय तज्ञ देखील आवर्जून उपस्थित राहणार आहेत. यामध्ये डॉ.भाऊसाहेब पुर्भे, डॉ.स्वप्निल वाघमारे, डॉ.सिताराम आळणे, डॉ.सतीश शिंदे बीड, डॉ.ज्ञानेश्वर निपटे, डॉ.विजयकुमार निपटे, डॉ.दिनकर बोंगाणे, डॉ.रवींद्र मुंडे, डॉ.सतीश शिंदे वडवणी, डॉ.जगदीश टकले, डॉ.महादेव खुपसे, डॉ.चाटे, डॉ.साळुंखे, डॉ.घाटूळ, डॉ.राहुल शिंदे, डॉ.देवेंद्र थोटे, डॉ.केशव आळणे हे वैद्यकीय तज्ञ उपस्थित राहून रुग्णांची तपासणी व चिकित्सा करतील. यावेळी वडवणी तालुका मेडिकल असोसिएशन यांचे सर्व पदाधिकारी व सदस्यही उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध औषध कंपन्यांचे वैद्यकीय प्रतिनिधी अभय पाठक, अनिल सोमवंशी, अशोक कुलकर्णी, अप्पासाहेब खरात, दिलीप चव्हाण, फिरोज भाई, इद्रिस भाई, मोईन भाई, मंगेश झरीकर, मनोज जानोळे, अण्णासाहेब शेळके, चंदू बारगजे, श्रीकांत होके, गजानन कुलकर्णी, गिरीश जामगडे, सचिन गायकवाड, लहू नागरगोजे, प्रशांत घुगरे, विकास होके, उमेश पवळ, विनोद भाई यांसह आदी वैद्यकीय प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत. तरी या मोफत सर्वरोग निदान व मोफत औषधोपचार शिबीराचा सर्व भाविकांनी तसेच पंचक्रोशीतील गरजू रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक रोटरी क्लब ऑफ वडवणीचे या उपक्रमाचे चेअरमन डॉ.जगदीश टकले, को.चेअरमन डॉ.विजयकुमार निपटे, अश्विनी हॉस्पिटलच्या वतीने गोकुळ पुर्भे, बाबुराव गवळी, विकास खाडे, शुभम पुर्भे, लकूळ पुर्भे, भाऊसाहेब नवले, रवींद्र माने, लखन डोंगरे, इमरान शेख, ज्ञानेश्वर वाव्हळ, गणेश कोळपे, उमेश शिंदे, बाबुराव बोंगाणे, बालाजी पतंगे, सचिन वाघ यांसह आदींनी केले आहे.

चौकट

डॉ.भाऊसाहेब पुर्भेंची वीस वर्षांपासूनची तपश्चर्या…

मागील २० वर्षांपासून अखंडितपणे व अविरतपणे महाशिवरात्रीच्या दिवशी सत्यवादी राजा हरिश्चंद्र पिंपरी संस्थान परिसरामध्ये मोफत सर्वरोग निदान व मोफत औषधोपचार शिबीराचे आयोजन यशस्वीपणे राबवून आजवर हजारो, लाखो गोरगरीब गरजू रुग्णांना नवे आयुष्यमान व जीवदान मिळवून देणारे देवदूत म्हणून डॉ.भाऊसाहेब पुर्भे यांना ओळखले जाते. त्यांची मागील वीस वर्षांपासूनची ही रुग्ण सेवेची तपश्चर्या म्हणजे इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षराने नोंद व्हावी असा हा अव्दितीय उपक्रम आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे वडवणी तालुक्याच्या शिरपेचात नक्कीच मानाचा तुरा रोवला गेला आहे अशी भावना प्रत्येक वडवणीकराच्या मनी रुजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.