Home » माझी वडवणी » वडवणीत “एक तालुका एक जयंती”

वडवणीत “एक तालुका एक जयंती”

वडवणीत “एक तालुका एक जयंती”

डोंगरचा राजा / आँनलाईन

– वडवणी येथे ढोल तश्याच्या गजरात पालखी मिरवणूक व रक्तदान शिबीराने शिवजयंती साजरी करण्यात आली.

वडवणी – “एक तालुका एक जयंती” प्रमाणे तालुक्यतील सर्व जाती धर्मांतील लोकांना सोबत घेऊन शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे .तालुक्यात एकच शिवजयंती होत असल्याने शिवप्रेमीमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. आज विविध सामाजिक उपक्रमात जयंती साजरी करण्यात आली. सकाळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात शिवप्रेमी सोबतच वडवणी पोलिसांनी देखील रक्तदान केले.सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात ध्वजारोहण करून साडेनऊ। वाजता ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली व अकरा वाजता छत्रपती संभाजी महाराज व्यापार संकुलनात रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात अली.या रक्तदान शिबिरात दुपारी तीन वाजेपर्यंत 65 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले.

वडवणी पोलिसांनी केले रक्तदान

शिवप्रेमी सोबतच वडवणी पोलिसांनी रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सह
भागी नोंदवला वडवणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवत रक्तदान केले व इतर शिवप्रेमिनीं रक्तदान करण्याचे आवाहन केले.

२७ फेब्रुवारी रोजी डिजेमुक्त मिरवणूक होणार

शिवजयंती मिरवणुकीत डीजे न लावता ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक होणार असल्याचे वडवणी तालुका सार्वजनिक जीवजन्मोत्सव समितीकडून सांगण्यात आलं आहे आज शिवजयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत असताना सामाजिक भान राखत यंदाची मिरवणूक डीजे मुक्त असल्याचे समितीच्या वतीने कळवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.