Home » माझा बीड जिल्हा » वैराणही पडली काळी – अँड.देशमुख

वैराणही पडली काळी – अँड.देशमुख

वैराणही पडली काळी – अँड.देशमुख

डोंगरचा राजा / आँनलाईन

– ज्वारीच्या पिकाचे अर्ध्यावर नुकसान वैराणही पडली काळी..

बीड – यावर्षी उशिरा पण भरपूर पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. चांगली पिके येतील, असे वाटत असतानाच ज्वारी आणि गव्हाच्या पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे. मात्र नुकत्याच निवडणुका झालेल्या असल्याने शेतकऱ्यांचे हे हाल होताना ही कोणाचेही तिकडे लक्ष जात नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल असला तरी देखील त्याला गप्प राहण्या शिवाय पर्याय नसल्याचे दिसत असल्याचे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.

यावर्षी ज्वारी आणि गहू पेरणी च्या वेळी शेतकरी अतिशय आनंदात होता. कामा पुरते पाणी होते. आणि पावसाने या हंगामासाठी साथ दिली होती. मात्र गेल्या एक महिन्यात ज्वारीवर पडलेल्या रोगाने आणि गव्हावर पडलेल्या रोगाने पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

बऱ्याच ठिकाणी ज्वारीला दाणे भरत नाहीत तर वैरणीवर रोग पडल्याने वैराण देखील काळी होत आहे. त्यामुळे जनावर आता ही वैरण खातात का नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.

हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला मात्र कोणीही आधार द्यायला नाही. काय करावे, हा प्रश्न पडला आहे. नुकत्याच निवडणुका झालेल्या असल्याने ता शेतकर्‍यांकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आणि फक्त पाऊस पडला एवढेच कारण दाखवून प्रशासन देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार नाही.

त्यामुळे शेतकऱ्याला आपल्या व्यथा कोणाकडे मांडाव्यात, हा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाने आता पुढाकार घ्यायला हवा घेण्यासाठी अशावेळी जिल्हा प्रशासनाने केवळ त्यांचे नुकसान झालेले आहे ज्या पिकाचे नुकसान झाले आहे, अशाच पिकाचे पंचनामे केले, तरी देखील या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हे काम हाती घ्यावे, असे देखील देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.