Home » महाराष्ट्र माझा » कुलकर्णी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा.

कुलकर्णी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा.

कुलकर्णी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा.

डोंगरचा राजा / आँनलाईन.

– रामराव कुलकर्णी यांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा.

*जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे शिष्टमंडळाची निवेदन देऊन मागणी.

– जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यवाही बाबत अधिकाऱ्यांना सूचना.

बीड- अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील शेतकरी श्री रामराव नारायणराव कुलकर्णी वय ७७ वर्ष यांना १० फेब्रुवारी २०२० सोमवार रोजी रस्त्यामध्ये अडवून मारहाण करत काही लोकांनी गाडीत घेऊन जाऊन अमानुष मारहाण करून त्यांना दि.११ रोजी सायंकाळी बर्दापूर फाटा याठिकाणी जखमी अवस्थेत आणून टाकले. सदरील प्रकार
माणुसकीला काळिमा फासणारा असून अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज जिल्हाधिकारी बीड व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असून याबाबत तात्काळ आरोपींना अटक करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

या बाबत सविस्तर माहिती अशी की अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर
येथील शेतकरी श्री रामराव नारायणराव कुलकर्णी वय ७७ वर्ष हे गावातच राहतात त्यांना एक मुलगा व दोन मुली असून १० फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बर्दापूर पोलीस ठाण्यात रामराव कुलकर्णी कामानिमित्त गेले असता संबंधित अधिकारी त्याठिकाणी नसल्यामुळे ते अंबाजोगाईला जात असताना गावातीलच काही लोकांनी त्यांना अडवून तुझी गट न ६८६ गटातील जमीन आम्हाला दे, कोर्टात सुरू असलेले भांडण काढून घे म्हणत बेदम मारहाण केली व आपल्या कारमध्ये टाकून एका शेतात नेऊन परत मारहाण केली. पाच लोकांनी ही मारहाण करून रामराव कुलकर्णी याना भारज या गावी एका घरी नेऊन पुन्हा मारहाण केली. रात्री तेथून गाडीत टाकून लातूर जिल्ह्यातील हिपरगा येथे नेऊन एक घरात डांबून ठेवले ११ फेब्रुवारी रोजी सकाळी तू कोर्टात सुरू असलेली केस काढून घेतली नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत हिपरगा, मुरुड, लातूर एमआयडीसी येथे घेऊन गेले व सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बर्दापूर फाटा येथे अत्यंत जखमी अवस्थेत टाकून निघून गेले मिलिंद कऱ्हाडे,उमेश कुलकर्णी,अनंत कुलकर्णी, शैलेश कुलकर्णी, शशिकांत कुलकर्णी, दिगंबर सबनीस या नातेवाइकांना आणि गावकऱ्यांना माहिती मिळताच त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून संबंधित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आद्यपही आरोपींना अटक न झाल्याने बीड येथे आज गुरुवार रोजी जिल्हाधिकारी साहेब व जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना प्रमोद पुसरेकर, नगरपालिका सभापती राजेंद्र काळे, माजी सभापती सुमंत रुईकर, अ.भा.ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जोशी, ऍड.अक्षय भालेराव, पेशवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोका कुलकर्णी,सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वांगीकर, ब्राम्हण महासंघ पुरोहित आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक कडेकर,अरुण पालिमकर, सुरेशराव कुलकर्णी यांच्यासह इतर लोकांनी भेट घेऊन अशा प्रकारे गुंडगिरी करून अमानुष मारहाण केली जात असेल तर शांतताप्रिय आणि लोकशाहीचा सन्मान करणाऱ्या लोकांनी दाद मागायची कोनाकडे हा प्रश्न उपस्थित करून शांतपणे जगणाऱ्या समाजासाठी, लोकशाहीसाठी आणि कायद्यासाठी घातक असणाऱ्या अशा गुंडगिरी करणाऱ्या लोकांना शासन होणे गरजेचे आहे असे निवेदन देताच जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकारी यांना सूचना कडक सूचना दिल्या असून आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असे आश्वासन दिले आहे. श्री रामराव नारायणराव कुलकर्णी यांना अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई न झाल्यास जिल्ह्याभरातच नाही तर राज्यात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे यावेळी निवेदनात सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.