प्रधानमंत्री किसान योजना कॅम्पचे आयोजन
डोंगरचा राजा / आँनलाईन
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने संदर्भात एका खास कॅम्पचे आयोजन करण्यात आले असुन या कॅम्पचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन साळींबा तलाठी सज्जाचे तलाठी भुषण पाटील यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील साळींबा तलाठी सज्जांतर्गत असणा-या शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी मिळाली असुन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने पासून जे शेतकरी वंचित आहेत तसेच पात्र शेतकऱ्यांनी आपले कुटुंबातील नावे व बॅंक खाते क्रमांक, आधार क्रमांक त्याचप्रमाणे इतर चुकांच्या दुरुस्ती संदर्भात एका खास कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.या कॅम्पची सुरुवात दिनांक १७/२/२०२० पासून २१/२/२०२० पर्यंत होत आहे.
यामध्ये दिनांक १७ फेब्रुवारी सोमवार रोजी मामला, दिनांक १८ फेब्रुवारी मंगळवार रोजी ढोरवाडी, दिनांक १९ फेब्रुवारी बुधवार रोजी कान्हापुर, दिनांक २० फेब्रुवारी गुरुवार रोजी साळींबा, दिनांक २१ फेब्रुवारी शुक्रवार रोजी लक्ष्मीपुर या ठिकाणी करण्यात आली आहे.तरी साळींबा तलाठी सज्जांतर्गत असणा-या वरील गावच्या सर्व संबंधित शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन तलाठी भुषण पाटील यांनी केले आहे.