Home » माझी वडवणी » चैतन्य महाराज यांची बीड येथे प्रवचन माला

चैतन्य महाराज यांची बीड येथे प्रवचन माला

चैतन्य महाराज यांची बीड येथे प्रवचन माला

– १७ फेब्रुवारी रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन

अमोल जोशी/ डोगरचा राजा ऑनलाईन 

बीड – येथील श्री संत सद्गुरु धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान बीड च्या वतीने दि.१५ ते १९ फेब्रुवारी २०२० दरम्यान ह.भ.प श्री सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अमृतवाणीतून “नारदभक्तिसूत्र” या पाच दिवसीय प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले असून या प्रवचनमालेच्या निमित्त्याने सोमवार दि.१७ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ठीक दहा वाजता दत्त मंदिर सुभाष रोड बीड येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शहरातील महिला, पुरुष, युवक, भाविक-भक्त, शिष्यपरिवार रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान शिबिरामध्ये सहकार्य करावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण इंगळे, रामराजे ठाकूर, ह.भ.प एकनाथ महाराज पुजारी, रामराजे राक्षसभुवनकर, उत्तमराव आमलेकर, सूर्यकांत कुलकर्णी, सुनील बेहरे, प्रा. मुकुंद देशमुख, श्रीनिवास कुलकर्णी, मधुकरराव वैद्य, रमेश रसाळ, अविनाश पानगावकर, प्रल्हाद धारूरकर, रमेशबुवा पोहनेरकर, धनंजय गोस्वामी, मकरंद कुलकर्णी, दत्तात्रय तळेकर, राघवेंद्र गोस्वामी, दत्तोपंत विडेकर, जगदीश माळेवाडीकर, श्रीकांत क्षीरसागर,अँड. मधुसूदन बाहेगव्हाणकर, अँड. प्रदीप देशमुख व श्री संत सद्गुरु धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान बीड च्या वतीने करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिराच्या नावनोंदणीसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण इंगळे (9422240666), सुनील बेहरे (9325730032), धनंजय गोस्वामी ( 9146792056), मकरंद कुलकर्णी (9404883637) या नंबरशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published.