जिल्हाधिकारी रेखावार यांनी पदभार स्विकारला.
डोंगरचा राजा / आँनलाईन
जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आज पदभार स्विकारुन विविध विषयांचा आढावा आणि उपक्रमा संदर्भात माहिती घेत कामकाजास सुरुवात केली. प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांचेकडून पदभार स्वीकारल्यानंतर विविध शासकीय विभागांचे अधिकारी -कर्मचारी विविध संघटना व संस्थांचे पदाधिकारी आदींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन स्वागत केले. अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील जिल्हाधिकारी श्री.रेखावार यांची भेट घेऊन बीड जवळील पालवण देवराई येथे १३ व १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या वृक्ष संमेलनाचे आमंत्रण दिले. यावेळी वृक्षसंमेलनाच्या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न केले जावेत असे जिल्हाधिकारी श्री रेखावार म्हणाले. याप्रसंगी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आणि श्री सयाजी शिंदे उपस्थित होते.