Home » माझा बीड जिल्हा » अँड.अजित देशमुख यांची नियुक्ती.

अँड.अजित देशमुख यांची नियुक्ती.

अँड.अजित देशमुख यांची नियुक्ती.

डोंगरचा राजा / आँनलाईन

– अँड. अजित देशमुख यांची गृहनिर्माण संस्थांच्या प्रशासक पॅनलवर नियुक्ती

बीड – महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत वेगवेगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्था कार्यरत आहेत. या संस्थांवर प्राधिकृत अधिकारी म्हणून प्रशासकाची नियुक्ती करण्यात येते. राज्यसरकारने अहर्ता प्राप्त व्यक्तींचे प्राधिकृत अधिकारी तथा प्रशासक पॅनल तयार केले असून या पॅनलवर अँड.अजित एम. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अशा प्रकारच्या प्रशासक नियुक्ती मध्ये आतापर्यंत सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या होत होत्या. आता पहिल्यांदा प्रशासना बाहेरील खाजगी व्यक्तींना या कामाची संधी सरकार उपलब्ध करून देत आहे, ही बाब विशेष आहे.

लातूर विभागातून या पॅनलवर केवळ चार व्यक्तींची निवड करण्यात आली असून यामध्ये बीड जिल्ह्यातून केवळ अँड. अजित देशमुख यांचा समावेश आहे. लातूर विभागात लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि बीड या चार जिल्ह्याचा समावेश आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७७, ७८, ७८ (अ) अन्वये लातूर विभागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांवर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी तथा प्रशासक यांचे पॅनल बाबत शासनाने धोरण जाहीर केल्यानंतर हा पॅनल विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर या पदावर काम करणारे श्रीकांत देशमुख यांनी नुकताच जाहीर केला आहे.

नांदेड येथील दोन व्यक्तींचा, लातूर येथील एकाचा बीड येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, शासनाचे वेगवेगळे शासन निर्णय, परिपत्रके, सूचना आणि आयुक्तां कडिल निर्गमित केलेल्या सूचना त्याप्रमाणे तसेच निबंधकांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे प्रशासकांना कामकाज करणे आवश्यक असते. लातूर उस्मानाबाद, बीड आणि नांदेड या चार जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र या प्रशासनाला देण्यात आले असून अनेक वादग्रस्त गृहनिर्माण संस्था आता रडारवर येऊ शकतात.

अशा प्रकारचे पॅनल तयार करण्याची आणि त्यावर खाजगी व्यक्तींना घेण्याची राज्य शासनाची ही पहिलीच वेळ आहे. अजित देशमुख यांचे अनेक हित चिंतकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.