Home » ब्रेकिंग न्यूज » मराठी पत्रकार परिषदेचा अक्कलकोट मेळावा

मराठी पत्रकार परिषदेचा अक्कलकोट मेळावा

मराठी पत्रकार परिषदेचा अक्कलकोट मेळावा

डोंगरचा राजा / आँनलाईन

मुंबई – प्रतिनिधी

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा आणि पत्रमहर्षि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आज शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2020 रोजी सोलापूर जिल्हयातील अक्कलकोट येथे सकाळी १० वाजता संपन्न होत आहे.राज्यभरातून सहाशेच्यावरती पत्रकार प्रतिनिधी या मेळाव्यास उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासचालक दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्धघाटन होत असून न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांच्या शुभहस्ते तालुका आणि जिल्हा संघांचे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक हे भूषविणार आहेत . आमदार प्रशांत परिचारक हे स्वागताध्यक्ष असतील.आमदार सचिन कल्याणशेट्टी,आमदार संजय मामा शिंदे ,महेश अण्णा इंगळे , किरण नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

दुपारच्या सत्रात दोन व्याख्यानं होणार आहेत .दुपारी 2 ते 3 या वेळात जेष्ठ पत्रकार अरूण खोरे यांचे ‘प्रश्‍न आहे पत्रकारांच्या अस्तित्वाचा’ या विषयावर व्याख्यान होईल तर 3 ते 4 या वेळात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख प्रा.रवींद्र चिंचोलकर यांचे ‘आधुनिक तंत्रज्ञान आणि आजची पत्रकारिता’ या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी 1.30 ते 2 या वेळात ‘संवाद परिषदेच्या पदाधिकार्‍यांशी’ हा आगळा-वेगळा कार्यक्रम होईल..या कार्यक्रमात पत्रकारांमध्ये बसून परिषदेचे पदाधिकारी त्यांच्या अडचणी,सूचना,प्रश्‍न समजून घेतील.
श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानच्या कल्याणराव इंगळे पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्रशस्त हॉलमध्ये हा सोहळा संपन्न होत असून राज्यातील जास्तीत जास्त तालुका आणि जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी मेळाव्यास उपस्थि राहावे असे आवाहन परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे,सरचिटणीस संजीव जोशी,कोषाध्यक्ष विजय जोशी,पुणे विभागीय सचिव बापुसाहेब गोरे,सोलापूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक मठपती,सरचिटणीस पी.पी.कुलकणी,अक्कलकोट तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदुकुमार जगदाळे आदिंनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.