Home » माझा बीड जिल्हा » ठेवीदारांची उद्या माजलगावात बैठक

ठेवीदारांची उद्या माजलगावात बैठक

ठेवीदारांची उद्या माजलगावात बैठक

– अँड.अजित देशमुख उपस्थित राहणार

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड – माजलगाव येथील सामाजिक परिवर्तन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित माजलगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड या पतसंस्थेच्या ठेवीदारांची बैठक उद्या माजलगाव येथे बोलावण्यात आली आहे. बायपास रोडवर असलेल्या संतोषीमाता मंदिरामध्ये सायंकाळी चार वाजता ही बैठक होणार असून या बैठकीत ठेवीदारांना पतसंस्थाचे अवसायक मंडळाचे अध्यक्ष अँड. अजित एम. देशमुख हे मार्गदर्शन करणार आहेत.

देशमुख यांचे बरोबर अवसायक मंडळाचे सदस्य अँड. सुभाष शिंदे आणि अँड. रवींद्र किर्दत हे देखील उपस्थित राहणार आहेत. सहकार खात्याचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. सामाजिक परिवर्तन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित माजलगाव, ही अडचणीत आली असून या संस्थेवर आता अवसायकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पतसंस्थेवर नियुक्त केलेले अवसायक मंडळ आपली जबाबदारी पार पाडणार आहे.

त्यामुळे ठेवीदारां बरोबर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. बैठकीस जास्तीत जास्त ठेवीदारांनी हजर रहावे. परिवर्तन मल्टीस्टेट संस्थेसाठी हे अवसायक मंडळ कार्यरत नसल्याने मल्टिस्टेट संस्थेच्या ठेवीदारांनी उपस्थित राहू नये. केवळ परिवर्तन नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांना उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.