Home » माझा बीड जिल्हा » मोठी बिले मात्र निघाली – अँड. देशमुख

मोठी बिले मात्र निघाली – अँड. देशमुख

मोठी बिले मात्र निघाली – अँड. देशमुख

डोंगरचा राजा / आँनलाईन

– निवडणुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा भत्ता प्रलंबित

बीड – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कर्मचाऱ्यांनी काम केल्याबद्दल त्यांना दिल्या जाणारा मोबदला अद्याप दिलेला नाही. मात्र मंडप, स्टेपलर, पिना, झेरॉक्स, बॅनर, अशा प्रकारचे काम करणाऱ्या लोकांची बिले मात्र काढले असल्याचे दिसते. यावरून निवडणुकीतले काम पारदर्शक होत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शासन नियमा प्रमाणे आणि भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निर्देशा प्रमाणे कर्मचाऱ्यांनी काम केले. या कर्मचाऱ्यांना वेगवेगळी कामे नेमून दिली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रभावीपणे काम करावे लागले. निवडणुकांमध्ये कोणताही गैरप्रकार अथवा अनुचित प्रकार घडल्यास त्या कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाते. म्हणून कर्मचाऱ्यांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागते.

मात्र निवडणूक झाल्यानंतर त्यांना वेळेत मानधन दिले गेले नाही. ही बाब अनेक तक्रारीवरुन समोर आली आहे. याबाबत काही कर्मचाऱ्यांनी थेट भारतीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली, यांच्याकडे तक्रारी नोंदवल्या आहेत.

आचारसंहितेची प्रभावी अंमल बजावणी करताना वेगवेगळी पथके नियुक्त केली गेली होती. या पथकात काम करणारे कर्मचारी, निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक बुथवर काम करणारे कर्मचारी, मतमोजणीच्या दिवशी राबलेले कर्मचारी, अशा कर्मचाऱ्यांना वेळेत बिल देणे गरजेचे होते. मात्र यांना अजूनही ताटकळत ठेवले असल्याचे दिसते.

दुसरीकडे कोट्यावधी रुपयांचा मंडप टाकण्यात आला. जवळपास पन्नास लाख रुपयाचे स्टेपलर, पिना, कोरे कागद, फाईल, फाईल टॅग इ. खरेदी करण्यात आली आणि मतदार जागृतीसाठी लावलेले बॅनर आणि झेरॉक्स यावर जवळपास साठ लाख रुपये खर्च झाला. यातील बहुतांश बिले निघाली असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. यावरून निवडणुकीच्या काळातील बिल काढन्यामध्ये मध्ये दुजाभाव झाला असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

हा दुजाभाव का झाला याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता, जिथे कुठे टक्केवारी ठरलेली होती, तिथली बिले अगोदर निघाली असल्याचे दिसते. तर याच बरोबर कर्मचारी आणि इतर संबंधितांना प्रशिक्षणाचे वेळी जेवण, चहापाणी, नाश्ता दिला जातो. यावर लाख रुपये खर्च होतात. मात्र हे देखील कर्मचाऱ्यांना वेळेवर मिळाले नसल्याचे अनेक कर्मचारी खासगीत सांगतात. यावरून निवडणुकीतील भ्रष्ट कारभार हा पुन्हा एकदा पुढे आला असल्याचे अँड. देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.