Home » माझी वडवणी » जगताप बंधुंचा आगळा-वेगळा उपक्रम.

जगताप बंधुंचा आगळा-वेगळा उपक्रम.

जगताप बंधुंचा आगळा-वेगळा उपक्रम.

डोंगरचा राजा / आँनलाईन

– आ.सुरेश धस यांच्या वाढदिवसा
निमित्त वडवणीत जगताप बंधूंनी राबवला आगळा-वेगळा उपक्रम

– जि.प.शाळेतील ५०० विद्यार्थ्यांना पॅडचे वाटप तर पसायदान सेवा प्रकल्पास महिन्याचे किराणा व राशन

वडवणी – बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे लोकप्रिय दमदार आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त वडवणी येथील भारत जगताप व शेषेराव जगताप या जगताप बंधूंनी आदर्श अशी सामाजिक बांधिलकी जोपासत येथील दोन जिल्हा परिषद शाळेतील तब्बल ५०० विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचे वाटप केले तर ढेकणमोहा येथील पसायदान सेवा प्रकल्पास महिनाभर पुरेल इतके धान्य किराणा व राशन असे साहित्य वाटप करीत आपल्या नेत्याचा वाढदिवस सामाजिक दयित्वातून साजरा केला.
उद्या दिनांक २ फेब्रुवारी २०२० रविवार रोजी बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे दबंग आमदार जनमाणसाचं रांगडं नेतृत्व आमदार सुरेश आण्णा धस यांचा वाढदिवस सर्वत्र विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. याचेच औचित्य साधत वडवणी येथील सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असणारे रोहयोचे माजी अध्यक्ष युवा नेते भारत जगताप व नगरसेवक शेषेराव जगताप या जगताप बंधूंनी आपल्या या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त वडवणी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मुलांची व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मुलींची या दोन्ही शाळेतील तब्बल ५०० विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचे वाटप करण्यात आले. यावेळी माजलगाव मतदार संघाचे युवा नेते राहुल काका जगताप, नगराध्यक्ष राजाभाऊ अण्णा मुंडे, जिल्हा बँक अध्यक्ष गोरख धुमाळ, जिल्हा बँक संचालक बाबरी मुंडे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष संजय आंधळे, भाजपा तालुकाध्यक्ष पोपटराव शेंडगे, युवा नेते राजेभाऊ मस्के, सरपंच दादासाहेब मुंडे, संचालक गोविंद मस्के, उपनगराध्यक्ष राजेभाऊ पवार, नगरसेवक महादेवराव जमाले, प्रेमदास राठोड, किसन राठोड, अंकुश वारे, सुग्रीव मुंडे, बद्रीनाथ व्हरकटे, राजेभाऊ उजगरे, उद्धव काकडे, ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ, बाबुराव जेधे, भैय्यासाहेब तांगडे, सुधाकर पोटभरे, शाळेचे मुख्याध्यापक भागवत घुले, संयोजक भारत जगताप, शेषेराव जगताप, बंडू नाईकवाडे, हरी पवार, ओम जाधव, शांतीलाल पवार, भैय्यासाहेब वाघमोडे, नितीन सव्वासे, जगन्नाथ घुमरे, जावेद शेख यासह शिक्षकवृंद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजाभाऊ मुंडे, संजय आंधळे, सुभाष वाव्हळ, भारत जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करीत आमदार सुरेश धस यांचे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेषेराव जगताप यांनी केले तर शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक भागवत घुले यांनी मानले. तसेच ढेकणमोहा ता.जि.बीड याठिकाणी डोंगरदऱ्यात व निसर्गाच्या हिरव्यादाट सानिध्यात वसलेले व अनाथ बालकांचे पालन-पोषण करून व त्यांचे पालकत्व स्विकारत समाजासमोर आदर्श निर्माण करीत असलेल्या पसायदान सेवा प्रकल्पास एक महिनाभर पुरेल इतके धान्य किराणा सामान असे राशन व विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचे वाटप करण्यात आले. यावेळी रोहयोचे माजी अध्यक्ष भारत जगताप, नगरसेवक शेषेराव जगताप, सरपंच हरी पवार, मोहन दादा जगताप मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष बंडू नाईकवाडे, ज्येष्ठ पत्रकार अशोक खाडे, शांतीलाल पवार, भैय्यासाहेब वाघमोडे, ज्ञानेश्वर वाव्हळ यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी या मदतीनंतर पसायदान सेवा प्रकल्पातील वास्तव्यास असलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील फुललेले हास्य अवर्णनीय असे होते. तसेच आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त जगताप बंधूंनी आपल्या या सेवा प्रकल्पास अन्नदान करून जपलेली सामाजिक बांधिलकी म्हणजे माणसातला देव शोधत माणुसकी जोपासण्यासारखे आहे असे गौरवोद्गार यावेळी पसायदान सेवा प्रकल्पाचे संचालक गोवर्धन दराडे यांनी व्यक्त केले. अशाप्रकारे या दोन्ही सामाजिक उपक्रमांतून भारत जगताप व शेषेराव जगताप या जगताप बंधूंनी समाजापुढे आदर्श निर्माण करीत आपले नेते आमदार सुरेश आण्णा धस यांचा वाढदिवस वडवणीमध्ये अशाप्रकारे आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published.