Home » ब्रेकिंग न्यूज » रु.२५००/- प्रमाणे बँकेत वर्ग – आ.प्रकाश सोळके

रु.२५००/- प्रमाणे बँकेत वर्ग – आ.प्रकाश सोळके

रु.२५००/- प्रमाणे बँकेत वर्ग – आ.प्रकाश सोळके

डोंगरचा राजा / आँनलाईन

– लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याकडुन
डिसेंबर-२०१९ अखेर ऊस बीलाचे पेमेंट प्रति टन रु.२५००/- प्रमाणेबँकेत वर्ग.
आ.प्रकाशदादा सोळके

माजलगाव – लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याकडुन चालु गळीत हंगामातील
१६/१२/२०१९ ते ३१/१२/२०१९ अखेर गाळप केलेल्या पंधरवाडयातील ऊस बीलाचे पेमेंट प्रती मे.टन
रुपये २५००/- प्रमाणे ऊस उत्पादकांचे बँक खाती आज दि. २९/१/२०२० रोजी वर्ग केले असल्याची
माहिती माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन आ.श्री.प्रकाशदादा सोळंके यांनी दिली. याविषयी
अधिक माहिती देताना ते म्हणाले की, कारखान्याचे सन.२०१९-२० चे ऊस गाळप हंगामातील गाळप
सुरु असुन दि.२८/१/२०२० अखेर ५७ गाळप दिवसामध्ये २५४५५० मे.टन ऊसाचे गाळप करुन
सरासरी ७.३८ टक्के साखर उता-याने १८१८७० क्विटल साखर पोत्याचे उत्पादन घेतलेले आहे.
याबरोबरच कारखान्याचा डिस्टलरी व को.जन प्रकल्प सुरु झालेला असून या प्रकल्पाचे माध्यमातुन
आजअखेर १२८६२६३८ युनीट विज महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीस विक्री केलेली आहे.
त्याचबरोबर डिस्टलरी प्रकल्पातुन आजअखेर ३२२०१२२ लिटर रेक्टीफाईड स्पीरीट तर १९९७६९४
लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतलेले आहे. चालु गळीत हंगामातील दि. ३/१२/२०१९ ते दि.१५/१२/२०१९
अखेर गाळप केलेल्या ५४२४३.७४७ मे.टन ऊसासाठीचे पेमेंट प्रती मे.टन रुपये २५००/- प्रमाणे
होणारी एकुण रक्कम रुपये १३.३७ कोटी ऊस उत्पादकांचे बँक खाती यापूर्वीच वर्ग केलेले आहेत.
पुढील कालावधीचा पेमेंट लवकरच अदा करणेचे कारखाना व्यवस्थापनाने निश्चीत केलेले होते.
त्यानुसार माहे १६/१२/२०१९ ते ३१/१२/२०१९ या कालावधी मधील ७३२७५.६३४ मे.टन ऊस
गाळपाचे प्रती टन रुपये २५००/- प्रमाणे पेमेंट वसुली वजा जाता रुपये १८.२३ कोटी ऊस उत्पादकांचे
बँक खाती आज दिनांक २९/१/२०२० रोजी वर्ग करण्यात आलेले आहेत. तरी ऊस उत्पादकांनी
आपल्या नजिकच्या बँक शाखेशी संपर्क साधुन ऊस बीलाचे पेमेंट घेवुन जावे व चालु हंगामातील
४.०० लाख मे.टन ऊस गाळपाचे उधिष्ठ पुर्ण करण्यासाठी आपला ऊस गाळपास देवुन सहकार्य करावे
असे आवाहन कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री मा.आ.श्री.प्रकाशदादा सोळंके व कारखान्याचे
जेष्ठ संचालक मा.श्री.धैर्यशीलकाका सोळंके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.