Home » ब्रेकिंग न्यूज » दिशा देण्याचे काम स्व.सुंदरराव सोळंके यांनी केले – ना.पवार

दिशा देण्याचे काम स्व.सुंदरराव सोळंके यांनी केले – ना.पवार

दिशा देण्याचे काम स्व.सुंदरराव सोळंके यांनी केले-ना.पवार

डोंगरचा राजा / आँनलाईन

– स्व. सुंदरराव सोळंके यांच्या पुतळ्याचे अनावरण.

माजलगाव – स्व. सुंदरराव सोळंके यांनी मराठवाड्यात विविध सिंचन प्रकल्प, महत्वाचे महामार्ग अनेक शिक्षण संस्था मार्गी लावून मराठवाड्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने दिशा दिली असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजलगाव येथे स्व. सुंदरराव सोळंके यांच्या अर्धकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी प्रतिपादन केले.

माजलगाव येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयामध्ये स्व सुंदरराव सोळंके यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, म.शि.प्र मंडळा चे अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके,आ.अमरसिंह पंडित, आ. संजय दौंड, आ. संदीप क्षिरसागर, माजी आ. राधाकृष्ण होके,माजी आ. डी. के. देशमुख, जि. प. अध्यक्षा सौ.शिवकण्या शिरसाट, माजी आ पृथ्वीराज साठे,धैर्यशील सोळंके,प्रदीप चव्हाण, शेख सलीम शेख अहमद,अनिल नखाते,प्रकाश भांडवलदार,भारतराव सोळंके, विजय सोळंके, आप्पासाहेब पाटील,प्रशाकीय अधिकारी प्रा माळी ऍड भानुदास डक, जयसिंह सोळंके, प्राचार्य डॉ.व्ही.पी.पवार यांची प्रमुख उपस्थिती होती..
यावेळी पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की सन 1963 साली बीड चे पाहिले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याचा मान स्व.सुंदरराव सोळंके यांना मिळाला आणि बीड येथे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला. ग्रामिण भागासाठी शिक्षणाचा मागासलेपणा पाहून त्यांनी शिक्षण संस्था उभारून शिक्षणाची दारे खुली केली तसेच त्यांनी अनेकांना नोकरीच्या संध्या निर्माण करून दिल्या त्यामुळे ‘मोफत नोकरी देणारे साहेब’ म्हणून स्व.सुंदरराव सोळंके यांना ओळखले जाते.पुढे बोलतांना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की येणाऱ्या काळात जातीय सलोखा ठेऊन शेतकरी, बेरोजगार,महिला अत्याचार, शिक्षणाचे प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की,स्व सुंदरराव सोळंके साहेबानी विकासाची दूरदृष्टी ठेऊन शेतकऱ्यांसाठी कर्ज माफीची पहिली मागणी केली. त्यांचे कार्य सर्वासाठी प्रेरणादायी आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समाधान इंगळे व प्रा डॉ एम ए कव्हळे यांनी केले तर आभार अविनाश येळीकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.