एस.एम.देशमुख पत्रकारांसाठी प्रेरणा देणारं व्यक्तीमत्व – ना.पवार धो
डोंगरचा राजा / आँनलाईन.
माजलगाव पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा दर्पण पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांच्या हस्ते व पालकमंत्री मा.धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री मा. हसन मुश्रीफ, आ.प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक .एस.एम.देशमुख यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री ना. अजित पवार म्हणाले की,एस.एम.देशमुख हे गेली अनेक वर्षे पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत आले.आम्ही त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पहात आलो आहोत.पत्रकार संरक्षण कायदा असो वा पत्रकार पेन्शन योजना असो यासह आदी महत्त्वाच्या प्रश्नांना त्यांनी महत्व देत ते मार्गी लावण्यासाठी लढा दिला.मी अनेक ठिकाणी त्यांचा लढा प्रत्यक्ष अनुभवला आहे. मागील काही वर्षांपूर्वी नागपूर येथे अधिवेशन काळात आमरण उपोषण केले होते तो काळ मी अनुभवला होता.असे हे महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांसाठी प्रेरणा देणारं व्यक्तीमत्व आहे.तुमच्या यापुढील काळात ज्या काही मागण्या असतील त्या पुर्ण करण्यासाठी आम्ही तत्पर राहु असे मतही उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, आ.प्रकाश सोळंके,आ.संदिप क्षिरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी आमदार मोहनराव सोळंके, माजी आमदार राधाकृष्ण होके, अशोक डक,पृथ्वीराज साठे, सभापती जयसिंह सोळंके यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.