Home » माझा बीड जिल्हा » पुतळा अनावर प्रसंगी उपस्थित रहा – आ.सोळंके.

पुतळा अनावर प्रसंगी उपस्थित रहा – आ.सोळंके.

पुतळा अनावर प्रसंगी उपस्थित रहा – आ.सोळंके.

रविकांत उघडे / माजलगांव

माजलगांव – महाराष्ट् राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष लोकनेते कै. सुंदरराव सोळंके यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावर येथील सोळंके महाविद्यालयात दि. 25
शनिवारी सकाळी 10.00 वाजता महाराष्ट् राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार असुन कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन मशिप्र मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार प्रकाशदादा सोळंके, स्थानिक नियोजन समितीचे अध्यक्ष अॅड. बी. आर. डक, प्राचार्य डाॅ. व्ही. पी. पवार यांनी केले आहे.
राजकारणासोबतच समाजाकारण केलेल्या कै. सुंदरराव सोळंके साहेबांच्या आठवणींची सर्वांना जाणीव रहावी व त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणुन मशिप्र मंडळाच्या येथील सुंदरराव सोळंके
महाविद्यालयात त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवारी दि. 25 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता महाराष्ट् राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार
आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी सामाजिक न्याय तथा पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांची तर ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, राष्ट्वादी काॅंग्रसचे कार्यकर्ते
पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मशिप्र मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार प्रकाशदादा सोळंके,सरचिटणीस सतिश चव्हाण, उपाध्यक्ष अमरसिंह पंडित, शेख सलिम शेख अहमद, सहचिटणीस अनिल नखाते,प्रभाकर पालोदकर, कोषाध्यक्ष डाॅ. अविनाश येळीकर, स्थानिक नियोजन समितीचे अध्यक्ष अॅड. बी. आर. डक,प्राचार्य डाॅ. व्ही. पी. पवार यांचेसह सर्व केंद्रीय कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.