Home » माझी वडवणी » प्रामाणिक पत्रकारिता प्रेरणादायी -एस.एम.देशमुख.

प्रामाणिक पत्रकारिता प्रेरणादायी -एस.एम.देशमुख.

प्रामाणिक पत्रकारिता प्रेरणादायी -एस.एम.देशमुख.

डोंगरचा राजा / आँनलाईन

– अधिस्विकृतीबद्दल मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सत्कार संपन्न

वडवणी – गेली चाळीस वर्षांपासून वडवणी सारख्या ग्रामीण भागात पत्रकारिता करणे म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. मात्र तत्कालिन परिस्थितीवर मात करीत ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ हे आज तागायत परखड निःपक्ष व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा मागोवा घेतला असता नेहमीच सत्याच्या बाजूला समर्थपणे उभे राहून वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आजवर त्यांनी निर्भीडपणे पत्रकारिता केलेली आहे हे मी देखील अगदी जवळून अनुभवलेले आहे. त्यांची खडतर व प्रामाणिक पत्रकारिता सर्व पत्रकार बांधवांसाठी खरोखर प्रेरणादायी आहे असे गौरवोदगार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी याप्रसंगी काढले.
दैनिक झुंजार नेताचे वडवणी तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकत्याच प्रदान करण्यात आलेल्या अधिस्विकृती पत्रिकाबद्दल त्यांचा वडवणी तालुक्यातील देवडी याठिकाणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांनी अभिनंदन सत्कार केला. याप्रसंगी संपादक अनिलराव वाघमारे, ह.भ.प.तुळशीराम राऊत महाराज, ज्ञानेश्वर वाव्हळ सह आदी मान्यवर व पत्रकार बांधव उपस्थित होते. देवडी येथील एस.एम.देशमुख यांच्या शेतातील निसर्गरम्य वातावरणात हा अभिनंदन सत्कार संपन्न झाला. यावेळी पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, या अधिस्विकृती पत्रिकेमुळे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय या पत्रकारितेच्या महत्त्वाच्या विभागामध्ये आता सुभाषराव वाव्हळ यांच्या नावाची शासन दरबारी अधिस्विकृतीधारक पत्रकार म्हणून नोंद झालेली आहे. या अधिस्विकृतीच्या माध्यमातून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना प्रवास सुविधा, आरोग्य सुविधा यासह इतर सुविधा मिळणारच आहेत. शिवाय राज्यातील पत्रकारांशी स्नेहबंध जोपासण्याचे माध्यमही मिळाले आहे. मुख्य म्हणजे वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून सन्मानपूर्वक पेन्शनसाठीही ते पात्र ठरणार आहेत. त्यांच्या आजवरच्या खडतर व प्रामाणिक पत्रकारितेचे फळ त्यांना मिळाले याचा आपणास खूप आनंद व हेवा वाटत आहे. भविष्यातही त्यांची पत्रकारिता उत्तरोत्तर अशीच प्रगल्भ होत जावो याच मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सदिच्छा असेही शेवटी एस.एम.देशमुख म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.