स्मारकाच्या कामात सहभाग याचे समाधान – ना.मुंडे
डोंगरचा राजा / आँनलाईन
– इंदू मिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामात माझा सहभाग असणार याचे समाधान असल्याचे मत सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे…
मुंबईच्या इंदू मिल जागेवर बांधण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या सनियंत्रणाची महत्वपूर्ण जबाबदारी सामाजिक न्याय खात्याकडे दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री श्री.अजित दादा पवार यांचं त्यांनी
मनापासून आभार ही व्यक्त केले आहे.
स्मारकासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुधारित संकल्पानुसार सादर केलेल्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प तीन वर्षात होणे अपेक्षित आहे. पुतळ्याची उंची वाढविण्याच्या निर्णयामुळे आवश्यक त्या परवानग्या तात्काळ घेण्यात येणार आहेत. जगाला हेवा वाटेल असं भव्य दिव्य भीमरायांचे स्मारक साकारणार आहे